आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khandesh Vikas Aghadi News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

राष्‍ट्रवादीसाठी खान्देश विकास आघाडी ‘तन-मन-धन’ लावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसंत वाणी - Divya Marathi
वसंत वाणी

जळगाव - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर खाविआचे नेते रमेश जैन यांनी मदतीचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी खाविआ सर्व शक्तीनिशी एकोप्याने मदत करणार असून, तन-मनासोबत ‘धना’चाही वापर करणार असल्याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी केला.


खाविआचे नेते रमेश जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर जैन व वाणी यांची संयुक्त पत्रकार परिषद रविवारी झाली. या वेळी वाणी यांनी आजचा दिवस म्हणजे दुग्धशर्करा योग असल्याचे सांगितले. दोन दिवस अजित पवार, शरद पवार, रमेश जैन व मी अशी दीर्घकाळ चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. तसेच आमदार सुरेश जैन यांचा जळगाव शहर व जिल्ह्यात प्रभाव असल्याचे सांगत त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, असा विश्वासही व्यक्त केला. रमेश जैन यांनी दिलेल्या आश्वासनानुसार खाविआ प्रचाराच्या कामाला लागली असून, त्यांचे सगळे नगरसेवक सोबत आहेत. शहराचा विकास व्हावा, असा खाविआचा प्रय} आहे व त्यासाठी त्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या अखत्यारीत व कक्षेत जे आहे ती मदत करणार असल्याचेही वाणी यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.


बरेच पाणी वाहून जाईल
लोकसभेत खाविआ मदत करणार असल्याने विधानसभेत राष्ट्रवादी त्यांना मदत करेल का? या प्रश्नाला सोयीस्कर बगल देत आता लोकसभेसाठी बोलू; निवडणुकीनंतर बरेच पाणी वाहून जाईल. त्यांना पाठिंब्याचे नंतर बघू, असे उत्तर वाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.


..तर नगरसेवकांवर कारवाई
सर्व पक्षांतील विचारसरणीचे लोक खाविआचे सभासद आहेत. त्यांचे आधीच्या पक्षांशी असलेले संबंध तोडण्याचा आमचा आग्रह नाही. आजही ते आघाडीचे नगरसेवक म्हणून सोबत आहेत. जोपर्यंत खाविआची भूमिका ठरत नव्हती तोपर्यंत त्यांना प्रचार करण्याचे बंधन नव्हते; परंतु आता खाविआने आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीसाठी काम करतील. तसेच सर्वांना आघाडीचा धर्म पाळावा लागेल; अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, असे खाविआचे नेते रमेश जैन यांनी सांगितले.

माझी किंमत मी समजतो
कोणाला पाठिंबा द्यावा, यासंदर्भात समितीने दिलेल्या अहवालानुसार निर्णय घेण्यात आला आहे. पाठिंबा देताना कोणत्याही अटी-शर्ती नसल्याचा उल्लेख करत खाविआ हा छोटा पक्ष आहे. त्यामुळे अटी-शर्तींचा प्रश्‍नच नाही. कारण माझी किंमत मी समजतो. राष्ट्रीय पक्ष अशा गोष्टींना किंमत देईल हे मी मानत नाही; परंतु खाविआची ताकद लक्षात घेता आघाडीच्या मदतीशिवाय विजय मिळवणे शक्य नाही. मनपा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने मदत केली; आता आम्ही मदत करतोय. शहरातील विकासाचे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी प्रय} करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने दिल्याचे सांगून आमदार सुरेश जैन यांचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचेही रमेश जैन म्हणाले. तसेच यापूर्वी मदत न करण्याच्या प्रश्‍नासंदर्भात बोलताना जैन यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीकडून मदत मिळाली नाही हे खरे असून, उलट भेदभाव केल्याचेही मान्य केले.


असे मांडले गणित
खाविआने राष्ट्रवादीला पाठिंबा देताना मतांचे गणितही जैन यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत खाविआला 41 टक्के मते मिळाली. राष्ट्रवादीला 22, तर कॉँग्रेसला 4 टक्के मते मिळाली होती. हे सगळे पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढणार असल्याचेही जैन म्हणाले.