आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झुंज मराठमोळी’ मालिकेत खान्देशी संस्कृतीचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देशी मातीतील झुंझार वृत्तीचे दर्शन लवकरच आपणास एका नव्या टीव्ही मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘ई-टीव्ही’ मराठीवरील ‘झुंज मराठमोळी’ या ‘ट्रॅव्हल अँड अँडव्हेंचर रिअँलिटी शो’ मध्ये महाराष्ट्रातील संस्कृतीसह खान्देशी परंपरेचे दर्शनही प्रेक्षकांना होणार आहे. मराठी मालिकेत प्रथमच अशा प्रकारचा ‘शो’ सादर करण्यात येत आहे. गायन आणि नृत्य यांचे रिअँलिटी शो गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळतच आहेत. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र हिंडून तेथील परंपरेशी जुळलेला, सर्वसामान्यांशी निगडीत गोष्टींवर भर टाकणारा 14 सेलिब्रिटीजना सोबत घेऊन प्रथमच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉजिकल थिंकर्स व रमेश देव प्रॉडक्शन प्रदर्शित तसेच संतोष कोल्हे आणि अतुल जोशी निर्मित होणार्‍या या शोच्या निमित्ताने 10 वर्षांनंतर र्शेयस तळपदे सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहे. विशेष म्हणजे या शोचे निर्माते संतोष कोल्हे हे मूळचे फैजपूर येथील रहिवासी आहेत.
असा आहे शो
राज्यातील प्रसिद्ध 14 सेलिब्रिटी यात सहभागी होणार आहेत. शेफ, डिझायनर, आर्टिस्ट, कोरिओग्राफर अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश यात असेल. मराठी मातीतील विविध भागांतील परंपरा या सेलिब्रिटीजना शिकाव्या लागणार आहेत. 12 शहरांची संस्कृती, परंपरा तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या सर्वसामान्य माणूस दररोज करतो, अशा दिसायला सोप्या मात्र प्रत्यक्ष करण्यास अत्यंत कठीण असणार्‍या या बाबी हे सेलिब्रिटीज टास्क म्हणून करणार आहेत. मालिकेच्या 26 एपिसोडमध्ये प्रत्येक शहरात दोन टास्क होणार आहेत. जो सगळे टास्क व चालीरीती पूर्ण करेल तो ‘झुंझार महाराष्ट्रीयन’ हा किताब पटकावणार आहे.
खान्देशी परंपरा

या मालिकेत फैजपूर येथील रथ ओढण्याची परंपरा दाखवण्यात येणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यात याचे चित्रीकरण फैजपूर येथे पार पडले. त्याचप्रमाणे शेकोटीवर वांगी भाजणे, त्याचे भरीत करणे या दैनंदिन बाबीही यात आहेत तर भिल्ल समाजातील धनुर्विद्या हा पारंपरिक खेळही यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तसेच या कार्यक्रमाची सुरूवात नागपूरपासून होईल. नागपूरला रावणाच्या 10 तोंडी प्रतिमेतील नऊ तोंडे भाल्याने उडवण्याची परंपरा आहे.