आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक १२ एप्रिल रोजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: महाविद्यालयाच्या पटांगणावर सभेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना प्रा.एस.ओ.माळी. सोबत अॅड.शशिकांत राणे.
जळगाव - पोलिसबंदोबस्तात सहायक धर्मदाय आयुक्त निरीक्षकाच्या निरीक्षणाखाली खान्देश शिक्षण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम रविवारी जाहीर झाला असून १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अॅड. शशिकांत राणे यांच्या अध्यक्षतेखाली खान्देश शिक्षण मंडळाच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा झाली.

प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर खान्देश शिक्षण मंडळाच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी अॅड. शशिकांत राणे होते. व्यासपीठावर चिटणीस प्रा.एस.ओ.माळी होते. सभेस संचालक डॉ.बी.एस.पाटील, दिलीप जैन, बजरंगलाल अग्रवाल, कुंदनलाल अग्रवाल, संदेश गुजराथी, सभासद डॉ. बी.आर. बाविस्कर, मोहन सातपुते, लोटन चौधरी, अॅड. कैलास पाटील, प्रसाद शर्मा, अनंत निकम, भारती गाला आदी उपस्थित होते. सचिव प्रा. एस.ओ.माळी यांनी निवडणूक घेण्याबाबत विषय मांडला. त्याला सभासदांनी संमती दिली. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

अशी आहे निवडणूक समिती
अॅड.शशिकांत राणे, लोटन महारू चौधरी, अॅड. कैलास लक्ष्मण पाटील, दिनेश वसंतराव नाईक चिटणीस प्रा.एस.ओ.माळी पदसिद्ध अशी समिती स्थापन केली आहे. सभेला राजू दिनकर पाटील हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रोसिडिंग नक्कल कागदपत्रे सोबत नेली आहेत.

पोलिस बंदोबस्तात सभा
महाविद्यालयाच्यासर्व प्रवेशद्वारांना कुलपे लावण्यात आलेली होती. त्यात ही सभा होणार नाही, असा समज विद्यमान सत्ताधा-यांचा होता. मात्र, तरीही प्रताप विद्यालयामध्ये परीक्षा सुरू असल्याने याची संधी साधत पाच संचालक सदस्यांनी त्यातून प्रवेश केला. सभेसाठी मैदान गाठून सभा यशस्वी केली. मात्र, महाविद्यालयाच्या प्रांगणात पोलिस बंदोबस्तात ही सभा झाली.

निवडणूक कार्यक्रम
*६फेब्रुवारी मतदार यादी प्रसिद्ध करणे
*१३ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवणे
*१६ फेब्रुवारी हरकतीस मंजुरी घेणे
*२४ फेब्रुवारी अंतिम यादी जाहीर करणे
*११ मार्च निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे
*१८ ते २२ मार्च उमेदवारी अर्ज स्वीकारणे
*२३ मार्च छाननी
*२७ मार्च उमेदवारी अर्ज मागे घेणे
*१२ एप्रिल मतदान
*१३ एप्रिल मतमोजणी
*१४ एप्रिल निकाल