आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khap Panchayat In Jamner Ramesh Lalsing Rathod Family

शेतीच्या वादातून कुटुंबास काढले जातीबाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - तालुक्यातील गोद्री तांडा येथील रमेश लालसिंग राठोड यांना शेतीच्या वादामुळे तीन वर्षांपासून जातीबाहेर काढण्यात आले आहे.
रमेश लालसिंग राठोड यांचे सोनसिंग राठोड, मोहनसिंग राठोड, धनसिंग राठोड व प्रेमसिंग राठोड या चौघा भावांच्या शेताला लागून शेत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीच्या कारणावरून त्यांच्यात वाद होते. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाचा निकाल रमेश राठोड यांच्या बाजूने लागला. त्यामुळे रमेश राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा उद्योग सोनसिंग राठोड व इतरांनी सुरू केला. सोनसिंग राठोड हे शिक्षक असून व्याजाने अनेकांना पैसे देतात. त्यामुळे तांड्यातील नागरिक त्यांच्या दबावात रहातात. सोनसिंग यांच्या दबावात तीन वर्षांपूर्वी रमेश राठोड यांच्या कुटुंबास जातीबाहेर काढले. यामुळे रमेश राठोड यांच्या आईने आत्महत्येचा प्रय} केला, अशी तक्रार रमेश राठोड यांनी पहूर पोलिसांकडे दिली होती.
या तक्रारीत सोनसिंग राठोड, मोहनसिंग राठोड, ताराचंद राठोड, प्रेमसिंग राठोड, ठाणसिंग चव्हाण, राजमल राठोड, प्रकाश राठोड, शिवलाल जाधव, भीमसिंग राठोड यांच्या नावाचा समावेश आहे.
स्थानिक पोलिसांकडून दिशाभूल
जातीबाहेर टाकून चालविलेल्या छळाबाबत पहूर पोलिस ठाण्यासह जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. तक्रार केल्यानंतर चौकशीला आलेल्या अधिकार्‍यांची स्थानिक पोलिस दिशाभूल करतात. रमेश राठोड, बहिष्कृत कुटुंबाचा प्रमुख
तक्रार खोटी
ज्यांच्याबाबत तक्रार आहे, ते रमेश राठोड याचे काका व जवळचे नातेवाईक आहेत. स्वत: चौकशीसाठी गेलो असता, रमेश राठोड हा लग्नकार्यात सहभागी असल्याचे फोटो, सीडी नातेवाइकांनी दाखवली. विष्णू आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक, पहूर