आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात,शेतकर्‍यांची क्रॉम्प्टनकडे भटकंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जून महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या वादळी वार्‍यामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच पंधरवडा उलटूनही क्रॉम्प्टनने हे खांब उभे केले नसल्याने खरीप हंगाम कसा घ्यावा? अशी चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली असून, शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी शेतकर्‍यांची क्रॉम्प्टनकडे भटकंती सुरू आहे. दरम्यान, वीज खांब उपलब्ध नसल्याने या कामाला विलंब होत असल्याचे क्रॉम्प्टनचे म्हणणे आहे.
खांब अद्यापही पडूनच
या महिन्यात 3 ते 5 जूनदरम्यान झालेल्या वादळी वार्‍यामुळे जळगाव तालुक्यातील असोदा, भादली, किनोद, ममुराबाद, नशिराबादसह अनेक गावांमध्ये वीजतारा तुटून खांब कोसळले होते. परिणामी, या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून, दुरुस्ती व नवीन कनेक्शनची कामेही रेंगाळली आहेत. तसेच पंधरा दिवस उलटूनही कोसळलेले व वाकलेले खांब त्याच स्थितीत आहेत. खरीप हंगामास सुरुवात झाली असून, आठवडाभरात जोरदार पाऊस झाल्यास पेरण्यांनाही सुरुवात होणार आहे. मात्र, कनेक्शन घेऊनही वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी कमालीचे चिंतित आहेत. याबाबत क्रॉम्प्टन कंपनीकडे चकरा मारूनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. महावितरण कंपनीच्या 80 टक्के वीज वसुलीबाबतच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. मात्र, वसुलीच्या नावाखाली ऐन हंगामाच्या सुरुवातीस वेठीस धरले जात असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून केल्या जात आहेत.
काम लवकरच पूर्ण करणार
खांब उभारण्याचे काम एका एजन्सीला दिले आहे. मात्र, त्यांच्याकडे खांब नसल्याने अडचणी येत आहेत. परिणामी, नवीन वीजजोडण्याही बंद आहेत. कोसळलेले खांब दुरुस्तीचे काम सुरू असून, चार दिवसांत ते पूर्ण होईल. तसेच नवीन खांबांची मागणी केली असून, उपलब्धतेनुसार दिले जात आहेत. प्रसाद महातोले, ग्रामीण मुख्य अभियंता, क्रॉम्प्टन
असोदा, भादली, किनोद, ममुराबाद, नशिराबादसह परिसरात अशापद्धतीने विजेचे खांब वाकलेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा बंद आहे.
चार बिघे कपाशी आधीच जळाली
पैसे भरूनही वीज कनेक्शन दिले जात नाही. याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे प्रत्यक्ष जाऊन आलो. त्यामुळे आता कुठे चार खांब मिळाले आहेत. ते स्वखर्चाने घरी आणूनही लावण्यास क्रॉम्प्टनकडून विलंब होत आहे. चार बिघे कपाशी आधीच जळाली आहे. त्यातच आता विजेसाठी भटकंती करावी लागत आहे. संदीप नारखेडे, शेतकरी