आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाविअाचे नगरसेवक सुरेश जैनांना भेटले, भाजप गोटात अस्वस्थता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना जामीन मिळाल्यानंतर शहरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. रविवारी दुपारी भाजपच्या अनिल चौधरींसोबत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पिंजारींनी सुरेश जैन यांची भेट घेतली. यानंतर सुरेश जैन यांच्या नेतृत्वात असलेल्या खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांनीही जैन यांची निवासस्थानी भेट घेतली. यामुळे भाजपची अस्वस्थता मात्र वाढली आहे.

२०११च्या निवडणुकीत मूळचे शिवसैनिक असलेले सदस्य खाविआच्या चिन्हावर निवडून आले होते. माजी आमदार सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली खाविआने प्रचार केला होता. यानंतर जैन कारागृहात गेल्यापासून शहरातील खाविआच्या नऊ नगरसेवकांची भाजपसोबत सलगी वाढली. माजी आमदार संतोष चौधरींनी शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर नगरसेवकांचा हा गट पुन्हा नाराज होत शिवसेनेपासून दुरावला. यानंतर खाविआच्या या सर्व नगरसेवकांचे भाजपसोबतचे संबंध अधिक दृढ झाले. मध्यंतरी खाविआचे स्थानिक नेते मनोज बियाणींसह सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. कारण या नगरसेवकांनी शिवसेना प्रवेश झालेल्या संतोष चौधरींपासून चार हात लांब राहणेच पसंत केले होते. शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्येही खाविआच्या नगरसेवकांची अनुपस्थिती खटकणारी होती. एकंदरीत विविधप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे आमदार संजय सावकारे यांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावून या नगरसेवकांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते.

मात्र, रविवारी सायंकाळी खाविआचे स्थानिक नेते मनोज बियाणी, गटनेते िकरण कोलते, नगरसेवक प्रकाश बतरा, प्रा. दिनेश राठी, राजू पारीख, युवा सेनेचे शहराध्यक्ष सागर वाघोदे आदींनी शिवसेनेचे माजी अामदार सुरेश जैन यांची भेट घेतली. यानंतर या नगरसेवकांचा संभाव्य भाजपप्रवेश टळण्याचे संकेत आहेत. या धक्कादायक घडामोडी पाहता भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

संतोष चौधरींनी घेतली भेट : शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार संतोष चौधरी यांनी सोमवारी आपल्या लवाजम्यासह सुरेश जैन यांची भेट घेतली. या वेळी सचिन चौधरी, राष्ट्रवादीच्या गटनेत्या सारिका पाटील यांचे पती युवराज पाटील, नगरसेवक मुस्ताक शेख, जे. पी. सपकाळे, अजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सापत्न वागणूक
गेल्यादोन ते अडीच वर्षांपासून भाजपच्या विविध कार्यक्रमात सक्रिय असलेल्या खाविआच्या नगरसेवकांना आता भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरही खाविआचे नगरसेवक दिसले नाही. कार्यक्रमपत्रिका किंवा अन्य ठिकाणीही त्यांना स्थान देण्यात आले नाही, अशी चर्चा खाविआ गोटात आहे. याच अस्वस्थतेतून त्यांनी जैनांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

पक्षादेश झुगारला होता
पालिकेच्याअडीच वर्षांच्या काळानंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडीसाठी खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांनी पक्षादेश बजावला होता. मात्र, नगरसेवकांनी हा पक्षादेश झुगारला होता. खाविआचे स्थानिक गटनेते किरण कोलते यांच्या आदेशानुसार नगरसेवकांनी युवराज लोणारींना मतदान केले होते. यामुळे शहरातील खाविआ भाजपमध्येच प्रवेश घेईल, अशी शक्यता होती. मात्र, जैन भेटीमुळे आगामी काळात काय चित्र राहील? याबाबत उत्सुकता आहे.
छायाचित्र: जैन यांना पुष्पगुच्छ देताना खाविआ नगरसेवक.
बातम्या आणखी आहेत...