आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी नगरसेवकाने केले युवकाचे अपहरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण परिसरातील माजी नगरसेवकाने शनिवारी रात्री एका युवकाचे घरातून अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. 

मेहरूण येथील जुम्मा शहा वखारीजवळ राहणारा युवक उमरखान हयातखान हा माजी नगरसेवक इबा मुसा पटेल, चांॅद मुसा पटेल अश्रफ शफी पटेल यांच्यात भांडण लावतो, असा संशय पटेल यांना आला होता. या कारणावरून पटेलबंधूंनी शनिवारी रात्री ११.४५ वाजता उमरखान याला घरातून उचलून दुचाकीवरून ऑटोनगर येथील एका गोदामात आणले. तेथे त्याला लोखंडी पाइप सळईने जबर मारहाण केली. पटेलबंधूंच्या तावडीतून सुटल्यानंतर उमरखान याने थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. मात्र, तेथे उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी उमरखान याचा जबाब घेतला. त्याने सांगितल्यानुसार इबा पटेल यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...