आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणापूर्वी दोनवेळा रंगीत तालीम;तिसऱ्यांदा साधला डाव समोर आलेले सत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्लॉटच्या लालसेने वरखेडी (ता.पाचाेरा) येथील राजेंद्र काशिनाथ कानडे (वय ५५) यांचे १४ जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. या अपहरणासाठी संशयितांनी दोनदा रंगीत तालीम केली होती. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून त्यांचा सराव नियोजन सुरू होते. या गुन्ह्याच्या तपासात या गोष्टी समोर आल्या आहेत.

कानडे यांच्या अपहरणप्रकरणी २३ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष भागवत पाटील, आधार रघुनाथ बडगुजर शेख फारुख शेख अय्युब यांना अटक केली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. तपासादरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नियोजनबद्धरीत्या अपहरणाचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणातील त्यांचे साथीदार माजिद शाह राहुल सोनवणे हे दोघे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी धुळे नाशिक या ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत.

दोनवेळा रंगीत तालीम : संतोषपाटील याच्यासह अपहरणकर्त्यांनी दोन महिन्यांपूर्वी अपहरणासाठी नियोजन केले होते. कानडे हे पाचोऱ्याहून वरखेडीकडे येताना रस्त्यावर कोणत्याही चारचाकी गाडीला हात देऊन थांबवतात त्यातून वरखेडीला येतात. त्यांची ही सवय अपहरणकर्त्यांनी टिपली होती. त्यानुसार त्यांनी संशय येऊ नये म्हणून दोन वेळा वेगवेगळ्या चारचाकी भाड्याने घेऊन कानडे यांना पाचोऱ्यातील भारत डेअरीपासून लिफ्ट दिली होती. मात्र, तिसऱ्या वेळी त्यांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांचे अपहरण केले. आरोपींनी हे कृत्य करण्याआधी रंगीत तालीम केल्याचे सां िगतल्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावली असून, ही पद्धत पोलिसांना मोठा धक्का देणारी ठरली आहे.

बोलण्यातून झाली लालसा
कानडेहे गप्पामध्ये नेहमीच व्यवहार, पैशांचा उल्लेख करीत होते. त्यामुळे कानडेंकडे खूप पैसे असल्याचा अंदाज संतोषने बांधला होता. तसेच त्यांच्याकडील पैसा कसा काढायचा? याचे गणित दोन महिन्यांपासून पाटीलच्या डोक्यात सुरू झाले. मात्र, सर्व पर्याय संपल्यानंतर त्याने वाममार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

आधीप्लॉटसाठी आणले ग्राहक
संतोषपाटीलची कानडेंशी ओळख होती. कानडे यांचे वरखेडी येथे वाइन शॉप असून, ते परिसरातील धनिक नागरिक आहेत. त्यांच्या मालकीचा एक प्लॉट विकण्यासाठी संतोष पाटीलने अनेक ग्राहक आणले. मध्यस्थी करून ५-१० लाख रुपये कमिशन मिळण्याच्या अपेक्षेने तो ग्राहक आणत होता. मात्र, व्यवहार होत नसल्याने तो निराश होता.