आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत चिमुरडीने केली शिताफीने सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अपहरण झालेल्या सुप्रीम कॉलनीतील पाचवर्षीय बालिकेने अपहरणकर्त्याला चौथ्या दिवशी गुंगारा देऊन स्वत:ची शिताफीने सुटका केली. आपल्या घरी गुरुवारी सुखरूप परतताच चिमुरडी आईला जाऊन बिलगली. अपहरणातील त्या तीन दिवसांत फक्त एकवेळचे जेवण मिळत असल्याचे ती बोबड्या स्वरात सांगत होती आणि तिच्या प्रत्येक शब्दांत शहारे आणणारी कहाणी उलगडत गेली. अल्फिया इस्राईल सय्यद असे या धाडसी बालिकेचे नाव आहे.

असे घडले अपहरणनाट्य
अल्फियाचे वडील इस्राईल सय्यद रिक्षाचालक आहेत. एका अनोळखी पुरुषाने सय्यद यांच्याकडे जेवणाची मागणी केली. त्यांनी त्याला रात्री 8 वाजता घरी जेवण दिले. त्यानंतर त्याने तेथेच मुक्काम केला. मंगळवारी 7 मे रोजी दुपारी 4 वाजता पुन्हा सय्यद यांच्या घरी आला. सय्यद दाम्पत्य घरी नव्हते. दोन्ही मुलेच घरी होती. त्याने अल्फिया हिला घेऊन परिसरातून पसार झाला. सय्यद दांपत्य रात्री दहा वाजेच्या सुमारास घरी आले तेव्हा अल्फिया आढळली नाही. अल्फियाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रात्री पोलिस ठाणे गाठले.
अल्फिया बर्‍हाणपूरजवळील मेरगुर्‍हाळ गावालगतच्या जंगलात सुखरूप आढळल्याचे सय्यद यांच्या दाम्पत्याने सांगितल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला.

‘वो पानी लेने गया और मै भाग आयी..!’
अल्फियाने अपहरणापासून ते सुटकेपर्यंतची शहारे आणणारी कहाणी बोबड्या स्वरात सांगितली. ‘‘वो पानी लेने गये और मै भाग आयी..! वो आदमी मुझे मोटारकार मे घुमाता था, एकही बार खाना दिया.’’ अल्फिया निरागसपणे सांगत होती. अल्फियाला बर्‍हाणपूरकडे नेले होते. अपहरणकर्ता रस्त्यात पाणी आणण्यासाठी गेला असतानाच अल्फियाने संधी साधून पळ काढला. त्यामुळेच तिची सुटका झाली. जंगलात एका दर्ग्‍याजवळ ती रात्रभर झोपून राहिली. सकाळी काही आदिवासी लोकांनी तिला विचारल्यानंतर हा प्रकार समोर आला.