आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानाच्या गटारीत पडल्याने खेळाडूची किडनी निकामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- छत्रपतीशिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानाच्या काठावर असलेल्या मोठ्या गटारीत पडल्यामुळे एका १२ वर्षीय फुटबॉल खेळाडूची किडनी निकामी झाली. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची क्रीडा संकुलाच्या प्रशासनाने साधी दखल घेण्याची तसदीसुद्धा घेतली नसल्याने खेळाडूंमध्ये संताप व्यक्त केला जात अाहे.
काशिनाथ पलोड स्कूलचा विद्यार्थी चेतन (नाव बदललेले) हा शनिवारी इंटरस्कूल फुटबॉल स्पर्धेसाठी त्याच्या संघासाेबत क्रीडा संकुलावर अाला हाेता. दुपारी वाजेच्या सुमारास त्यांचा सामना होणार होता. त्यामुळे ताे मैदानातील गॅलरीखाली असलेल्या माेकळ्या जागेकडे जात हाेता. मैदानकाठावरील सुमारे चार फूट खोल तीन फूट रुंद गटार अाेलांडताना त्याचा ताेल गेल्याने ताे काेसळला. यात त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला कठड्याचा जाेरदार मार बसला. त्याला तत्काळ सहयोग क्रिटिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ.अमोल महाजन डॉ.स्नेहल फेगडे यांनी त्याच्यावर उपचार केले. चेतनच्या शरीरातील उजव्या बाजूच्या किडनीला प्रचंड दुखापत झाल्यामुळे ती किडनी काढून टाकावी लागली अाहे.

सुरुवातीपासूनगटार उघडीच : क्रीडासंकुल तयार झाल्यापासून ही गटार उघडीच आहे. अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत मैदानावर सामने होत असतात; अशा वेळी मैदानाबाहेर प्रखर प्रकाश पडेल, अशी व्यवस्था केलेली नसते. त्यामुळे ही गटार बंदिस्त करण्यात यावी, अशी मागणी जखमी खेळाडूच्या वडिलांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केली.

प्रशासनअनभिज्ञ : शनिवारीदुपारी १२.३० वाजता घडलेल्या या घटनेची माहिती क्रीडा संकुलाचे सुरक्षारक्षक, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांना रविवारी सायंकाळी मिळाली.
जिल्हा क्रीडा संकुलाची याच गटारीवरून पडल्याने खेळाडूला दुखापत झाली.

जास्त फरक पडणार नाही
चेतनचीएक किडनी काढून टाकावी लागली आहे. मात्र, त्याचा काही वाईट परिणाम त्याच्या शरीरावर होणार नाही. एका किडनीच्या बळावर तो एक सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगू शकतो. त्याला दुसरी किडनी बसवण्याचीही गरज भासणार नाही. डॉ.स्नेहलफेगडे, चेतनवर उपचार करणारे डॉक्टर

लवकरच कार्यवाही
शनिवारीघडलेली घटना रविवारी सायंकाळी कळली. त्यानंतर जखमी मुलाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. उघडी गटार बंद करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. सुनंदापाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी
बातम्या आणखी आहेत...