आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचे ‘जेलभरो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-अंगणवाडी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप बाराव्या दिवशीही सुरूच होता. कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यात दोनशे अंगणवाडी सेविकांना अटक करून सुटका करण्यात आली.

अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ व्हावी, महागाई भत्ता, आजारपणाची रजा यासह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यातील 2 लाख आणि जिल्ह्यातील 8 हजार अंगणवाडी कर्मचारी 6 जानेवारीपासून संपात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले; मात्र अद्याप निर्णय न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अडीच हजार अंगणवाडी मोर्चात सहभागी झाले होते. संघटक चिटणीस रामकृष्ण पाटील, मंगला नेवे, नंदा देवरे, मीनाक्षी चौधरी, शुभांगी बोरसे, सुनंदा नेरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.