आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगावात महिलांचा हंडा मोर्चा; पदाधिकाऱ्यांची पाचावर धारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीमध्ये हंडा मोर्चा घेऊन आलेल्या संतप्त महिला. - Divya Marathi
किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीमध्ये हंडा मोर्चा घेऊन आलेल्या संतप्त महिला.
यावल- तालुक्यातील किनगाव बुद्रूकमधील प्रभाग क्रमांक ५मध्ये गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे संतप्त महिलांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला. हा प्रभाग सरपंच ज्योती महाजन यांच्या असल्याने नागरिक अधिक संतप्त झाले. 
 
किनगाव बुद्रूक येथे महाजनवाड्यासह संपूर्ण प्रभाग ५मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. याच प्रभागातील रहिवासी असलेल्या सरपंच ज्योती अशोक महाजन यांच्याकडे नागरिकांनी पाणी मिळत नसल्याबाबत तक्रारी केल्या. मात्र, उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणीपुरवठ्यासाठी होणारी उपाययोजना आणि महिला-पुरुषांना करावी लागणारी भटकंती पाहता बुधवारी संतापाचा बांध फुटला. प्रभागातील महिलांनी हंडामोर्चा काढून ग्रामपंचायत गाठली. सरपंच येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. मात्र, सरपंचांचे पती अशोक महाजन, ग्रामपंचायत सदस्य डी.एन. महाजन यांनी सतंप्त महिलांची समजूत काढली. केवळ पिण्याचे पाणीच नव्हे, तर जागोजागी तुंबलेल्या गटारी, स्वच्छतेच्या मुद्यावर महिलांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. मुक्ताबाई महाजन, प्रमिला महाजन, शोभा महाजन, रमेश महाजन, गंगाराम महाजन, सदस्य डी.एन. महाजन, आनंदा महाजन, प्रमोद महाजन, यशवंत महाजन, सरला महाजन, सुरेश महाजन आदींची उपस्थिती होती.
 
भटकंतीची वेळ 
ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने प्रभाग पाचमधील रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याविषयी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना केल्यास ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्याविषयीचे संकेत बुधवारी झालेल्या हंडा मोर्चातून मिळाले. 
 
 
आश्वासन नको, कृती करा 
पाणीपुरवठ्यातील अडचणींबाबत यापूर्वीच तोंडी तक्रारी केल्या होत्या. तसेच मेन लाइनवरील नळ कनेक्शन कट करावे, अशी मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील अडचणीदेखील सुटत नाही. याचेच परिणाम हंडा मोर्चात झाल्याचा आरोप महिला-पुरुषांनी केला. 
 
समस्येचे मूळ कारण असे 
प्रभाग क्रमांक ५ मध्ये जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहे. परिणामी पुढील प्रभागापर्यंत (शेवटच्या भागापर्यंत) पूर्ण दाबाने पाणी पोहोचत नाही. आता मात्र मेन लाइनवरील सर्व नळ कनेक्शन कट करण्यात येतील. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशोक महाजन यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...