आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किशोर चौधरी हत्या: संशयिताने कचरा पेटीतून काढला टाेच्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चाैघुले प्लाॅटमधील किशाेर चाैधरी हत्याप्रकरणी मुख्य संशयित सुरेश साेनवणे याने खुनासाठी वापरलेला बर्फ फाेडण्याचा टाेच्या पाेलिसांना काढून दिला अाहे. तर याप्रकरणात संशयित नगरसेवक कैलास साेनवणे यांची नेमकी काय भूमिका अाहे? याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अात्माराम प्रधान यांनी सांगितले.

किशाेर चाैधरी याचा १० मार्चला बर्फ फाेडण्याच्या टाेच्याने भाेकसून खून केला हाेता. याप्रकरणी अटकेतील मुख्य संशयित सुरेश साेनवणे याला पाेलिस मंगळवारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन गेले हाेते. पोलिसांनी त्याच्याकडे टाेच्याची चौकशी केली. त्याने चाैघुले प्लाॅटमधील नाल्याजवळ असलेल्या रिक्षा थांब्याच्या बाजूला कचऱ्यात टाेचा फेकल्याचे सांगितले. तेथे पाेलिसांनी तपासणी केल्यावर टाेचा सापडला. संशयित सागर सपकाळे अंजना काेळी यांना बुधवारी न्या. ए. डी. बाेस यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली.

माेबाइल सीडीअार तपासल्यानंतर कारवाई
हत्येप्रकरणी१५ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यात एक संशयित म्हणून नगरसेवक कैलास साेनवणे यांचेही नाव अाहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात त्यांची नेमकी भूमिका काय अाहे, याबाबत प्रत्यक्षदर्शी, साक्षीदारांचे जबाब नाेंदवल्यानंतर, तसेच त्यांच्या माेबाइल सीडीअार तपासल्यानंतर कारवाई केली जाणार अाहे. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू अाहे असे प्रधान यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...