आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: किशाेर राजेनिंबाळकर 38 वे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावचे ३८ वे जिल्हाधिकारी म्हणून किशाेर राजेनिंबाळकर यांची नियुक्ती झाली असून ते शनिवारी पदभार घेणार अाहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर हाेते. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याचे अादेश त्यांना बुधवारी प्राप्त झाले. 

जळगावचे अपर जिल्हाधिकारी पद रिक्त असल्यामुळे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल बुधवारी पदभार साेडू शकल्या नाहीत. गुरुवारच्या मुहूर्तावर शिर्डी संस्थानचा पदभार घेण्याची इच्छा असल्याने त्यांनी किशाेर राजे निंबाळकर यांच्याशी फाेनवर चर्चा केली. परंतु निंबाळकर यांच्या जागेवर बदली झालेले व्ही.एल. भिमनवार यांनी पदभार घेतला नसल्याने निंबाळकरांनी गुरुवारी पदभार घेण्यास असमर्थता दर्शवली. रुबल अग्रवाल या १७ फेब्रुवारी २०१४ राेजी जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या हाेत्या. 
बातम्या आणखी आहेत...