आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याच्या दप्तरात चाकू; शिक्षकाच्या सतर्कतेमुळे उघड, शाळेत चौकशी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नववी दहावीत शिकणाऱ्या चार मित्रांच्या दप्तरात चाकू आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार ला.ना. शाळेत उघडकीस अाला. याप्रकरणी चाैघा विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करण्यासंदर्भातील कारवाई संस्थाचालकांच्या विचाराधिन आहे.

गेल्या महिन्यात १९ तारखेला ला.ना. शाळेतील नवव्या वर्गात शिकणारे तीन दहावीतील एक, असे चौघे मित्र शाळेत कुजबुज करीत असल्याचे शिक्षकांना अाढळून आले. त्यातील एका मुलाच्या दप्तरात चाकू आढळून आला. शिक्षकांनी त्या चौघांना मुख्याध्यापकांकडे नेले.
त्यानंतर हा विषय संस्थाचालकांपर्यंत पोहचला. चारही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून या प्रकरणाविषयी माहिती दिली. तसेच त्या दिवसापासून या चाैघा विद्यार्थ्यांना शाळेत बसू देण्याचा निर्णय संस्थेने घेतला. अद्याप त्यांना शाळेतून कमी केले नसून तो निर्णय विचाराधिन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हा चाकू वाढदिवसाचा केक कापण्यासाठी शाळेत आणल्याचा जबाब मुलांनी पालक, शिक्षकांसमोर त्याच दिवशी दिला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले संस्थाध्यक्ष...