आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - येथील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या आवारात दि.२१ सप्टेंबर रोजी तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दि.२६ रोजी सात जणांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रीय महाविद्यालयाच्या आवारात दि.२१ रोजी राहुल देविदास पवार (रा.नेताजी चौक)याच्यावर सात जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून प्राणघातक हल्ला केला होता. त्यात राहुलच्या पायावर नीलेश गुंजाळ याने काेयत्याने सपासप वार केले. तसेच आकाश राठोड याने राहुलचा मित्र मंगेश गवळी यास फायटरने मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या राहुलला धुळे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथील पोलिसांनी राहुलचा जबाब नोंदवल्यानंतर तशी माहिती चाळीसगाव पोलिस ठाण्यास कळवली. याप्रकरणी आरोपी कल्याण देशमुख, नीलेश गुंजाळ, गोपाळ परदेशी, आकाश राठोड यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा रजि.नं. २७०/२०१५, भादंवि कलम ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी अथवा जखमी यापैकी कोणीही संबंधित महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

महाविद्यालयात आणले
जखमीराहुलवर सध्या डॉ.वाय.पी.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, या हल्ल्यात त्याच्या पायाच्या नसा कापल्या गेल्याने धुळे येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मी घटनेच्या दिवशी हिरापूर रोडवरून चाललो असताना हल्लेखोरांनी महाविद्यालयाच्या गेटसमोर अडवून दुचाकीची चावी काढून घेतली. तसेच मला महाविद्यालयात फरपटत आणून मारहाण केली असल्याचे राहुलने सांगितले. मानेवर केला गेलेला कोयत्याचा वार हाताने चुकवल्याने राहुलच्या हाताच्या बोटांना गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे बोटांना टाके पडले आहेत.