आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेबिट कार्डवरील हक्क जाणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बॅँक खातेधारक, डेबिट कार्डधारकांसाठी असलेल्या इन्शुरन्स योजनांबाबत ग्राहक जागरूक नसल्याने अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत. ग्राहक संपर्कच करीत नसल्याने ग्राहकांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही. डेबीटकार्डसाठी असलेल्या इन्शुरन्स, परचेस प्रोटेक्शन कव्हर योजनेचा फायदा घेण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक आहे. बॅँकेच्या अटी-शर्ती, कागदपत्रांची पूर्तता आणि जागरूकता दाखविल्यास ग्राहकांना दुर्लक्षित असलेल्या योजनांचा लाभ मिळू शकतो.

सर्वच बॅँकांनी डेबिट, क्रेडीट कार्डवर विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यात अपघात विमा आणि खरेदी संरक्षण या दोन योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे. ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना विम्याचा लाभ आणि कार्डद्वारे खरेदी केलेली वस्तू चोरी गेल्यास त्या रकमेचा मोबदला देण्याच्या योजनांचा समावेश आहे. कार्ड घेताना त्यासंबंधी माहिती मिळविणे ग्राहकांसाठी आवश्यक आहे.

अँक्सिस बॅँकेने दिली विम्याची रक्कम

ग्राहकांना सामान्य आणि प्लॉटिमन या प्रकारात अनुक्रमे दोन व पाच लाखांच्या विम्याची योजना असलेल्या अँक्सिस बॅँकेने चार खातेदारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना विम्याची संपूर्ण रक्कम मिळवून दिली आहे. सामान्य कार्डधारकाला दोन तर प्लॉटिनम कार्डधारकांना पाच लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्यात आली.

स्टेट बॅँक ऑफ इंडिया : सर्वाधिक मोठे नेटवर्क असलेल्या स्टेट बॅँकेने ग्राहकांसाठी अपघात विमा आणि खरेदी संरक्षण दिले आहे. गोल्ड इंटरनॅशनल डेबिट कार्डधारकांना दोन लाखांचे विमा संरक्षण आणि पाच हजार रुपयांचे परचेस प्रोटेक्शन कव्हरेज दिले आहे. युवा इंटरनॅशनल डेबिट कार्डधारकांनाही दोन लाखांचा विमा आणि पाच हजारांचे खरेदी संरक्षण आहे. विशेष डेबिट कार्डधारकांनाही याच प्रकारची योजना लागू करण्यात आली आहे.
कोटक महिंद्रा : कोटम महिंद्राच्या क्लासिक डेबिट कार्डवर ग्राहकांना खरेदी संरक्षण देण्यात आले आहे. डेबिटकार्डवरील खरेदी केलेली वस्तू चोरी गेल्यास त्या बदल्यात विमा संरक्षण म्हणून बॅँक ग्राहकांना लाभ मिळवून देते. क्लासिक कार्डधारकांना 75 हजारांपर्यंत संरक्षण मिळू शकते. यासाठी ग्राहकांनी 30 दिवसांच्या आत बॅँकेकडे कागदपत्रांसह तक्रार करणे आवश्यक आहे.

तत्काळ संपर्क साधा
4ग्राहकांनी बॅँक व्यवहार आणि विविध योजनांच्या बाबतीत जागृत असले पाहिजे. घटनेनंतर तत्काळ संबंधित शाखेशी संपर्क, विमा योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची पूर्तता हा आवश्यक भाग आहे. नितीन चालसे, व्यवस्थापक, अँक्सिस बॅँक

वारसाला महत्त्व
बॅँकांच्या नव्या धोरणाप्रमाणे नवीन सर्व खातेधारकांना डेबिट कार्ड दिले जाते. बॅँकेतील रक्कम, विम्याचे संरक्षण यासाठी वारसाचे नाव नोंदविणे आवश्यक असते. अनावश्यक त्रास टाळण्यासाठी वारसांची नोंद महत्त्वाची ठरते.

हे करा..
खाते उघडताना कार्डसोबत मिळालेली कागदपत्रे जपून ठेवा, बॅँकेच्या अटी-शर्ती, कागदपत्रांची पुर्तता याबाबत बॅँकेकडे चौकशी करा. विमा, खरेदी संरक्षण आणि विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी वारस आणि इतर तांत्रिक माहिती उपलब्ध ठेवा.

अँक्सिस बॅँक : सामान्य कार्डधारक ग्राहकाने अटी व शर्ती पूर्ण केल्यास अपघातात मृत्यू झाल्यानंतर वारसाला दोन लाख रुपये तर प्लॉटिनम कार्डधारकाला पाच लाखांच्या विम्याचे संरक्षण मिळते. कार्डच्या प्रकारावर विम्याची रक्कम अवलंबून आहे. ग्राहकाला विम्याच्या पात्रतेसाठी महिन्यातून किमान एकवेळा डेबिटकार्डने खरेदी करणे आवश्यक असते.
कार्पोरेशन बॅँक : बॅँकेच्या डेबिट कार्डधारकांना पाच लाखांपर्यंतचा मोफत विमा देण्यात आला आहे. कन्व्हेन्स डेबिट कार्ड, गोल्ड डेबिट कार्ड, कॅम्पस कॅश कार्डधारकांना पाच लाखांचा विमा आहे. एक वर्षासाठी ग्राहकांना 50 हजारांचा परचेस कव्हरेज आहे.

आयसीआयसीआय : बॅँकेच्या विविध प्रकारच्या आठ डेबिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकरचे वैयक्तिक अपघात विमा, परचेस प्रोटेक्शन कव्हरच्या योजना आहेत. सिल्व्हर कार्डवर 50 हजारांचा अपघात विमा, 50 हजारांचा खरेदी संरक्षण विमा आहे. गोल्डकार्डवर 15 लाख अपघात विमा, टिटानियम-15 लाख, प्लॉटिनियम- 20 लाख, वर्ल्ड कार्ड-20 लाख, सिग्नेचर -3 कोटी, बिजनेस प्लॉटिनम, बिजनेस गोल्ड- 20 लाख रुपयांचा विमा तर या सर्व कार्डवर 1 ते 2.5 लाखांचा खरेदी संरक्षण विम्याची योजना आहे.
युनियन बॅँक : युनियन बॅँकेच्या इंटरनॅशनल डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार, खरेदी करणार्‍या कार्डधारकांसाठी मोफत अपघात विम्याची योजना आहे. यात कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाखांची मदत मिळते.
एचडीएफसी बॅँक : एचडीएफसी बॅँकेच्या इझीशॉप गोल्ड डेबिट कार्ड वापरणार्‍या ग्राहकांना पाच लाखांपर्यंत विम्याचे संरक्षण आहे.