आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका पैसे कमावण्याचा अड्डा अशी ओळख पुसणार, कार्यक्रमात आमदार संजय सावकारे यांची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - बांधकाम व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या परवान्यांतून पालिकेत गैरव्यवहार होतो. पालिका ही पैसे कमावण्याचा अड्डाच बनली असल्याचे गेल्या काळात समोर आले होते. मात्र, आता भाजपच्या कार्यकाळात ही काळी ओळख पुसणार आहोत, अशी ग्वाही आमदार संजय सावकारे यांनी दिली. क्रेडाई संस्थेतर्फे शनिवारी प्रभाकर हॉलमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार झाला, या वेळी ते बोलत होते.
भाजपच्या कार्यकाळात शहरातील एकाही बांधकाम व्यावसायिकाला त्रास होणार नाही, असे त्यांनी सांगितले. क्रेडाईचे अध्यक्ष गोविंदा ढाके, उपाध्यक्ष राजन फालक, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित सदस्य मुन्ना तेली यांनी विचार मांडले. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. उमेश घुले, चेतन पाटील, सुनील पाटील आदींनी सहकार्य केले.

बांधकाम व्यावसायिकांनी संकल्पना मांडावी
शहराच्याविकासासाठी बिल्डर हा घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. या घटकाला पालिकेकडून आगामी काळात सन्मान दिला जाईल. शहरातील विविध विकासात्मक कल्पना त्यांनी पालिकेकडे मांडाव्यात. त्यांच्या मतांचा आदर होईल. रस्ते, उद्याने आदी विकासात्मक कामांसाठी त्यांच्याकडून आलेले प्रस्ताव स्वागतार्ह राहतील. पालिकेतील पारदर्शक कामांसाठी या घटकाला प्राधान्य देणार असल्याचे या वेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
बातम्या आणखी आहेत...