आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केअारए इम्पॅक्ट; टार्गेट तीन, वसूल केले साडेपाच काेटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाेन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या अायुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर विभागप्रमुखांना दिलेल्या केअारएचा इम्पॅक्ट पालिकेतील सकारात्मक कामावरून दिसू लागला अाहे. घरपट्टी विभागाला अाॅगस्ट महिन्यासाठी दिलेल्या टार्गेटच्या दीडपट वसुली करून प्रभाग समित्यांनी जाेरदार सलामी दिली अाहे. तीन काेटींचे नियाेजन असताना कर्मचाऱ्यांनी तब्बल काेटी ३२ लाखांची वसुली केल्याने समाधान व्यक्त केले जात अाहे.

महापालिकेवर कर्जाचा डाेंगर अाहे, हे वाक्य अाता जळगावकरांच्या अंगवळणी पडले अाहे. परंतु, यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही वर्षात अपेक्षित प्रयत्न झाले नाही. राजकीय इच्छाशक्ती यात कुठेतरी कमी पडल्याची भावना व्यक्त हाेत अाहे. पालिकेची सर्वच पातळीवर गाेची हाेत असताना अाता महापालिकेच्या अायुक्तांनी मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले अाहे.
पदभार घेतल्यानंतर अायुक्त जीवन साेनवणेंनी सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या विभागाशी निगडित कामांचा केअारए निश्चित करून त्यावर काम करण्याचे निर्देश दिले हाेते. या कामांचा दर महिन्याला अाढावा घेऊन अधिकाऱ्यांवर एकप्रकारे जबाबदारी निश्चित केल्याने अधिकाऱ्यांसाेबत कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी वाढली अाहे. याचे ताजे उदाहरण घरपट्टी विभाग ठरले अाहे.

दर महिन्याला टार्गेट वाढवण्यात येणार
घरपट्टी विभागासाठी दर महिन्याला टार्गेट वाढवण्यात येणार अाहे. पूर्वी नाेव्हेंबर, डिसेंबर महिन्यात घरपट्टी वसुलीसाठी नियाेजन अाखले जात हाेते. परंतु, यंदा चार महिने अाधीच कर्मचारी कामाला लागले अाहेत. अाॅगस्ट महिन्यातील चांगल्या कामानंतर सप्टेंबर महिन्यात काेटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात अाल्याचे अायुक्तांनी सांगितले.

महापालिका पाचपट दंडावर ठाम
मनपाने ठराव क्रमांक ४० मंजूर करून गाळेधारकांना पाचपट दंड करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार कारवाई सुरू करणार त्यापूर्वीच शासनाने या ठरावाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली अाहे. राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेतली जाणार अाहे. येत्या १३ सप्टेंबर राेजी ही बैठक हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. शासनाने स्थगिती देताना बैठकीच्या अनुषंगाने पालिकेकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवला हाेता. त्यानुसार पालिकेने नुकताच अहवाल नगरविकास विभागाला सादर केला असून त्यात महापालिकेने केलेला ठराव याेग्य असून त्यावर ठाम असल्याचे कळवले अाहे. त्यामुळे शासन हा ठराव विखंडित करते, की पर्याय सुचवते याकडे अाता लक्ष लागून अाहे.

पालिकेचे चित्र नक्की बदलणार
अायुक्तांनीघरपट्टी विभागालाही दर महिन्यासाठी टार्गेट निश्चित केले अाहे. चालू अार्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत घरपट्टी विभागाने काेटी ३८ लाख वसूल केले हाेते. परंतु, अाॅगस्ट महिन्यात केअारए निश्चित झाल्यानंतर अाॅगस्ट महिन्यासाठी काेटींचे टार्गेट देण्यात अाले हाेते. त्यावर महिनाभर राबलेल्या वसुली कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण करत टार्गेटच्या दीडपट वसुली करून अायुक्तांना सकारात्मक प्रतिसाद दिला अाहे. कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्यास पालिकेचे चित्र नक्की बदलेल, असा विश्वास अायुक्तांनी व्यक्त केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...