आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवसात शहरात ‘क्रिश-3’चे 26 विक्रमी शो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळीच्या पर्वावर क्रिश-3 हा चित्रपट शहरातील सर्वच चित्रपटगृहातून प्रदर्शित होऊन पहिल्याच दिवशी 26 शो झाले. त्यामुळे कुठेही हाऊसफुल्लचा बोर्ड पहायला मिळाला नाही. दरम्यान, चित्रपट चांगला असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटल्या.

दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा एकमेव क्रिश-3 हा एकमेव चित्रपट सर्वच सिनेमाघरात झळकला. त्यामुळे सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ह्या चित्रपटाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शुक्रवारी प्रेक्षकांनी सोईनुसार चित्रपटाचा आनंद घेतला. शहरात जवळपास सर्वच चित्रपटगृहांमध्ये झळकल्याने पहिल्याच दिवशी 26 शो दाखविण्यात आले. पुढील आठवड्यात सत्या-2 हा चित्रपट रिलीज होईल.

प्रेक्षकांनी घातला गोंधळ
नटवर मल्टिप्लेक्समध्ये 48 फुटी स्क्रिन असलेल्या सिनेमाघराचा शुभारंभ शुक्रवारी ह्या चित्रपटापासून झाला. सकाळी व रात्री साडेनऊच्या शो सॅटेलाइटवरील प्रक्षेपणातील अडचणींमुळे बंद पडला. त्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घातला. मल्टिप्लेक्स दोनच्या स्क्रीनवर प्रेक्षकांना चित्रपट दाखविण्यात आला. दरम्यान, नवीन प्रोजेक्टर असल्याने सॅटेलाइटवरून प्रक्षेपणास अडचणी आल्या. तंत्रज्ञांकडून प्रोजेक्टरची दुरुस्ती करून पुढील शो पूर्ववत करण्यात आले, असे संचालक मेहुल त्रिवेदी यांनी सांगितले