आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Krishna's Educational Diplacement ; Ignorance Of Mp Supriya Sule's Notice

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कृष्णा’चे शैक्षणिक विस्थापन ; खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘हॉटेल बॉय’ म्हणून चहा द्यायला आलेल्या 14 वर्षे वयाच्या रंगलाल पवार ऊर्फ कृष्णाला चांगल्या शाळेत टाकून त्याचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्र्यांना दिलेली सूचना मोठी प्रसिद्धी मिळवून गेली खरी; पण त्या ‘इव्हेंट’मुळे कृष्णाचे पुनर्वसन होण्याऐवजी शैक्षणिक विस्थापनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जानेवारी महिन्याच्या 21 तारखेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगाव शहरात महिला मेळावा झाला. त्याआधी त्यांना चहा देण्यासाठी आलेल्या कृष्णाकडे पाहून त्यांनी त्याची चौकशी केली. जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील आश्रमशाळेत तो शिकत होता. पण त्या आश्रमशाळेतील मुलाचा खून झाल्यामुळे सर्व मुले घाबरून घरी निघून आली होती. घरची परिस्थिती वाईट आणि शाळा बंद असल्याने तो एका चहाच्या टपरीवर कामाला लागला आणि तिस-या च दिवशी खासदार सुळे यांच्यासमोर गेला. त्यांनी चौकशी केली तेव्हा मला चांगल्या शाळेत खूप शिकायचं आहे, असं कृष्णाने सांगितलं. ती जबाबदारी राष्‍ट्रवादी काँग्रेस उचलेल अशी घोषणा करीत कृष्णाची चांगली शैक्षणिक व्यवस्था करण्याचे निर्देश सुळे यांनी पालकमंत्र्यांना व्यासपीठावरच दिले.

त्या ‘इव्हेंट’च्या मोठ्या बातम्या झाल्या. खासदार आणि मंत्र्यांबरोबर कृष्णालाही मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याला 19 फेब्रुवारीला 30 दिवस पूर्ण होत आहेत आणि कृष्णाची अवस्था होती त्यापेक्षा वाईट झाली आहे.
मधूनच प्रवेश घेतल्याने तात्पुरती ही शाळा निवडली. नवीन वर्षात त्याला चांगल्या शाळेत घालणार आहे.’’ गुलाबराव देवकर, पालकमंत्री, जळगाव