आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना दोन लाख 85 हजार रुपयांचे अनुदान मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष घटक योजनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, असे नामकरण करण्यात आले आहे. या अंतर्गत विहीर खोदण्यासाठी लाख रुपये इतर बाबींसाठी ८५ हजार रुपये उपलब्ध करून दिल्याने या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 
 
सन १९८२पासून अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा, पीक संरक्षण अवजारे, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन विहीर आदी बाबी १०० टक्के अनुदानावर अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना दिल्या जातात. मात्र, अाता या योजनेचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, असे करण्यात आले आहे.
 
या योजनेतील बाबींसाठीच्या निधीत एक लाख, तर विहिरीवर विद्युतपंप बसवणे शक्य असलेल्या फीडरमधून वीजपुरवठा करणे, वीज येणे शक्य नसेल तेथे सौर ऊर्जेतून नवीन जोडणी देण्यासाठी एकूण ८५ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या योजनेत सन २०१६-१७ मधील निवड झालेल्या लाभार्थ्यांना नवीन योजनेतील बाबनिहाय लाभ दिला जाणार नाही. त्यांना जुन्याच योजनेनुसार निधी दिला जाणार आहे. 
 
...असे आहे अनुदान 
नवीन योजना सन २०१७-१८मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना लागू करण्यात येणार आहे. नवीन विहिरीसाठी लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रुपये, इनवेल बोअरिंग २० हजार रुपये, पंप संच २५ हजार रुपये आणि शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...