आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार साहित्‍य संमेलन : उगवत्या कलावंतांच्या कलेने भरला कला महोत्सवात रंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- फक्तपुस्तकी अभ्यासापेक्षा अापल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शुक्रवारी विविध प्रकारच्या कलांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी कला महाेत्सवात रंगत अाणली. गायन, वादन, नृत्य, नाट्याचा मेळ साधत विविध कलांची अनाेखी शृंखला गुंफण्यात अाली.
विवेकानंद प्रतिष्ठान अायाेजित खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलन अाणि कला महाेत्सवाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुंबई येथील डॉ.सुचेता बीडकर यांच्या मार्गदर्शनाने झाली. तत्पूर्वी सरस्वतीदेवीच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करण्यात आले.

या वेळी डॉ.बीडकर यांनी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने का करतो? किंवा आज नटराजाचे पूजन का केले? असे प्रश्न विचारून त्यांचा अर्थ उलगडला. त्यानंतर संगीत विषयाबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, संगीत मनुष्याला आयुष्यात पदोपदी आनंद देते. त्यामुळेच भारतीय सण-उत्सवांत संगीताचा समावेश करण्यात आला अाहे. रवी फडके यांनी ‘तू बुद्धी दे... तू तेज दे...’, ‘बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला...’, वसंत सरदेसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...’ वीर सावरकरांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...’ या गाण्यांचे सादरीकरण करून वातावरणात रंग भरला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या ग्रुपने ‘सांग सांग भोलानाथ... पाऊस पडेल काय?’ हे गीत सादर करून संमेलनात सहभाग नोंदवला. याप्रसंगी भूषण गुरव यांनी तबल्यावर साथसंगत केली. उद््घाटन सत्राचे सूत्रसंचालन स्वाती बेंद्रे आणि पूजा साळवी यांनी केले.
लाेकनृत्यस्पर्धेत विविध शाळांनी सहभाग नाेंदवला. या वेळी रंगीबेरंगी वेशभूषांनी संपूर्ण मंच उजळून निघाला हाेता. विविध प्रकारच्या वेशभूषांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यात पारोळा येथील एनईएस गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाअाे, बेटी पढाअाे’चा संदेश देऊन उपस्थितांना भारावून टाकले. ‘अाे री चिरय्या नन्ही सी गुडीया अंगना में फिर अा जा रे...’ या गीताने सुरुवात करत उपस्थितांना थक्क केले. तसेच अादिवासी, अासामी, गाेंधळ, जाेगवा, राजस्थानी आदी लाेकनृत्यांचे सादरीकरण करण्यात अाले. ‘चांदणं चांदणं झाली रात...’, ‘बिहू...’, ‘नदीच्या पल्याड...’सारख्या गाण्यांवर नृत्य सादर झाले. खान्देशी संस्कृतीचेही दर्शन या नृत्यातून घडले. लावणीला शिट्या अाणि टाळ्यांची दाद मिळाली. अनुभूती स्कूल-२मधील विद्यार्थ्यांच्या बांबू नृत्याने सर्वांना अाश्चर्यचकित केले. डाॅ.अपर्णा भट मुकेश खपली यांनी परीक्षण केले.

वादविवाद स्पर्धेने व्यासपीठ गाजवले
क्तृत्वआणि वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने व्यासपीठ चांगलेच गाजवले.

वक्तृत्व ही स्पर्धा दाेन गटात घेण्यात अाली. त्यामध्ये ५वी ते ७वीच्या गटात ‘माझ्या कल्पनेतील शाळा’, िवश्वमानव स्वामी विवेकानंद’ ‘भारतीय सणांचे बदलते स्वरूप’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी अापली मते मांडून अाधुनिक तंत्रज्ञानावर अाधारित शाळेला महत्त्व दिले. तसेच स्वामी विवेकानंद यांची पूर्ण माहितीदेखील सांगण्यात अाली. ‘भारतीय सणांचे बदलते स्वरूप’मध्ये काेणी चांगले, तर काेणी वाईट परिणाम सांगितले. ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी ‘विज्ञानमहर्षी डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम’, ‘साेशल मीडियाच्या िवळख्यात अाजची तरुणाई’ ‘दुष्काळ- िचंता चिंतन’ याबाबत माहिती दिली. साेशल मीडियाच्या अतिवापरामुळे अापल्या अाराेग्यावर घातक परिणाम हाेत असून, तरुणाई याच्या जाळ्यात अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. वादविवाद स्पर्धेत ५वी ते ७वीच्या मुलांनी ‘अाजचे िवद्यार्थी परीक्षार्थी की ज्ञानार्थी’ अाणि ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी ‘भारत महासत्ता- स्वप्न की वास्तव’ याबाबत माहिती दिली. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डाॅ.ऊर्मिला पाटील शैलजा पप्पू, तर वादविवाद स्पर्धेचे प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले.

विद्यार्थ्यांचीधमाल
संमेलनातीलविविध कार्यक्रमांचा आनंद घेत या वेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी चांगलीच धमाल केली. प्रत्येक स्पर्धेत सहभागी झालेल्या अापल्या शाळेतील स्पर्धक विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थी टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. एकाच छताखाली विविध स्पर्धा कार्यक्रम असल्याने एक स्पर्धा अाटाेपली की दुसऱ्या स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी विद्यार्थी धावपळ करत होते. तसेच इतरांचेही सादरीकरण मन लावून पाहत हाेते. सुटीच्या दिवसाप्रमाणेच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांचा आनंद लुटला.

"लल्लाटी भंडार' या गीतावर नृत्य करताना शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थिनी.
उत्स्फूर्त प्रतिसाद
या संमेलनातील कलागुणदर्शन पाहण्यासाठी विविध शाळांतील विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
सर्जनशीलतेचे दर्शन
रांगोळी, चित्रकला, नृत्य, नाटक, आदी विविध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन झाले मूक नाट्यातून संदेश मोबाइलचे दुष्परिणाम, पाणी बचत, सर्वधर्मसमभावाचा मूकनाट्यातून दिला संदेश. नृत्यांचा अविष्कार लोकनृत्यासह विविध प्रांतातील नृत्य कलावंत विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

वैचारिक मेजवानीनंतर कलेचा भरला मेळा
संमेलनातीलपहिल्या दिवसाच्या वैचारिक मेजवानीनंतर दुसऱ्या दिवशी कलेचा मेळा भरवण्यात आला हाेता. त्यात समूह नृत्य, समूह गीत, मूकनाट्य, विडंबन नाट्य, किल्ले तयार करणे, चित्रकला, रांगाेळी, सुगम गीतगायन, वादन, वक्तृत्व, वादविवाद या कलांचे सादरीकरण करण्यात आले. या कला महाेत्सवातील गर्दीने डाॅ.अाचार्यनगरी फुलून गेली हाेती. या नगरीतील बालगंधर्व रंगमंच, राजा छत्रपती शिवाजीनगरी, राजा रवी वर्मा दालन, पंडित भीमसेन जाेशी दालन, कवयित्री बहिणाबाई चाैधरी दालन आदी रंगमंचांवर विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात अाल्या. विशेष म्हणजे, ज्या कलेची स्पर्धा हाेती, त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे नाव त्या मंच विभागाला दिले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा कुमार साहित्‍य संमेलनातील फोटो
बातम्या आणखी आहेत...