आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवायसी नसलेल्या ग्राहकांना 112 रू दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केवायसीचे भूत ग्राहकांची मानगुटी सोडायला तयार नाहीच. सिलिंडरच्या अनुदानासाठी नागरिक चांगलेच हैराण झाले होते. यातून सुटका मिळत नाही तोच आता बॅँकांनी केवायसी नसलेल्या खातेदारांना 112 रुपये दंड आकारणे सुरू केले आहे.

खासगी व राष्ट्रीयकृत बॅँकांमधील प्रत्येक खातेदाराला मार्च अखेरपर्यंत केवायसी करण्याच्या सूचना बॅँकांनी दिल्या होत्या. त्या उपरही बहुतांशी खातेदारांनी केवायसी केलेली नाही. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात संबंधित ग्राहकांचे खाते अपडेट करण्यास अडचणी निर्माण होताहेत. गेल्या महिन्यात केवायसी न करणार्‍या खातेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा फतवा रिझर्व बॅँकेने काढला आहे. केवायसी नसलेल्या खातेदारांना 112 रुपये दंड केला जात आहे.

खाते तात्पुरते लॉक होणार : स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेत 42 हजार खातेदार आहेत. यापैकी 28 हजार खातेदारांनीच केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित खातेदारांनी केवायसीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे असे ग्राहकांचे खाते तात्पुरते लॉक करण्याचा निर्णय काही बॅँकांनी घेतला आहे.

ग्राहकांना आवाहन करूनही केवायसीसाठी प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे आता बॅँकेने केवायसी नसलेल्या खातेदारांना 112 रुपये दंड आकारण्याच्या कारवाईस सुरुवात केली आहे. प्रदीप टंडन, मुख्य प्रबंधक- स्टेट बॅँक