आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेळशाची टंचाई; मागणी वाढल्याने भारनियमन, 4 हजार 85 मेगावॅट विजेची तूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्यातील महानिर्मितीच्या वीज केंद्रांना निर्माण झालेला कोळशाचा तुटवडा उष्णतेमुळे कृषी पंपांसाठी वाढती वीज मागणी यामुळे राज्यावर आपत्कालीन भारनियमनाचे संकट अाेढवले अाहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशीही महावितरणची वीज मागणी १४ हजार ८००, तर राज्याची मागणी १९ हजार मेगावॅटदरम्यान असल्याने महावितरणच्या ते जी या ग्रुपवरील फीडरवर भारनियमन केले जात अाहे. 
 
पितृपक्षातील उन्हामुळे पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी पावसाळ्यात बंद असलेल्या वीजपंपांचा वापर सुरू झाला. त्यामुळे विजेची मागणी वाढली. याच दरम्यान महानिर्मितीच्या केंद्रांना कोळशाच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे राज्याची वीज मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली. राज्याला महानिर्मितीकडून सात हजार मेगावॅट खासगी वीजनिर्मिती उद्योगांकडून हजार ९४५ मेगावॅट विजेचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, कोळसाटंचाईमुळे महानिर्मितीकडून केवळ हजार ५००, तर खासगी क्षेत्रातील वीजनिर्मिती कंपन्यांकडून (अदानी, मे. एम्को सिपत) केवळ हजार ३६० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. अर्थात १० हजार ९४५ मेगावॅट पुरवठ्याचे नियोजन असताना केवळ हजार ८६० मेगावॅट पुरवठा असल्याने हजार ८५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून महावितरणने वीजहानी गळती अधिक असलेल्या ते जी या वितरण ग्रुपवर भारनियमन सुरू केले आहे. मंगळवारी काही भागांत डी ग्रुपवरही भारनियमन करण्यात आले. ऐन पावसाळ्यातच दोन टप्प्यांत सात तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने राज्यभरात रोष वाढला आहे. 
 
आजपासून स्थिती नियंत्रणात : राज्याचीवीज उपलब्धता पाहता महावितरणने खासगी वीज उद्योगांकडून ४०० मेगावॅट वीजखरेदीचे नियोजन केले आहे. बुधवारपर्यंत ही वीज उपलब्ध होण्याची आशा आहे. 
 
कोळशासाठी प्रयत्न 
महानिर्मितीच्या केंद्रांना मुबलक कोळसा मिळण्यासाठीही ऊर्जा विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या कोळसा नसल्याने स्थापित क्षमतेच्या तुलनेत केवळ ७० टक्के पीएलएफ (फ्लांट लोड फॅक्टर) ठेवून वीजनिर्मिती केली जात आहे. देशांतर्गत आयात कोळसा उपलब्ध झाल्यास ही निर्मिती वाढून भारनियमनाच्या झळा कमी होतील.
बातम्या आणखी आहेत...