आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मविश्वास डगमगल्याने विद्यार्थ्‍याने आयुष्यातून घेतली‘निवृत्ती’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘मला जीवनात काहीच स्वारस्य राहिलेले नाही... मी स्वत:चे आयुष्य घडवू शकत नाही... मी आपला पुष्कळ पैसा कोणत्याही सुधारणेशिवाय आणि फायद्याशिवाय व्यर्थ घालवला... पप्पा तुम्ही प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात... मी तुम्हाला मदत करू शकत नाही...,’ अशी भावनाविवश चिठ्ठी लिहून आत्मविश्वास डगमगलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी वाजता मुक्ताईनगरात घडली.
मुक्ताईनगरातील गट क्रमांक २८ मधील १०/३ क्रमांकाच्या गजानन ज्ञानदेव वाघ यांच्या खोलीत एसएमआयटी महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणारा निवृत्ती माणिकराव काकडे (वय २० वर्षे, रा.धानोरा, ता.सिल्लोड) हा राहत होता. त्याच्यासोबत अभियांत्रिकी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या अंकुश सुनील जावळे, मेकॅनिकलचा विद्यार्थी रोशन पाटील, प्रितम सोनवणे आणि शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी निखिल चौधरी राहत होते. खोलीमालक वाघ हे एसएमआयटी महाविद्यालयात कॅशिअर आहेत.

मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निवृत्ती काकडे वगळता त्याचे चारही खोलीतील मित्र महाविद्यालयात गेले होते. दुपारी वाजता भूक लागल्याने अंकुश जावळे हा विद्यार्थी महाविद्यालयातून खोलीवर आला. खोलीचे समोरचे दार आतमधून बंद होते. त्याने तीन ते चार वेळेस दार ठोठावले; मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तो मागच्या दरवाजाकडे गेला. हा दरवाजा उघडाच होता. त्यामुळे घरमालकाचा मुलगा पंकज वाघ अंकुशने घरामागच्या भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. या वेळी किचनमध्ये निवृत्ती पंख्याला गळफास घेऊन लटकलेला दिसला. त्याला बघून अंकुश जोरात ओरडला आणि बाहेर पडला. त्याचे सर्व अवसान गळून पडले. त्याला काहीच सूचत नव्हते. अश्रू अनावर झाले होते. त्याच्या ओरडण्याने शेजारी धावत आले. लागलीच त्याने इतर रूममेट्सला मोबाइलवर संपर्क साधून बोलावले. त्यानंतर दुपारी १.३० वाजता जिल्हापेठ पोलिसांनी निवृत्तीचा मृतदेह खाली उतरवला. निवृत्तीच्या दप्तरात पोलिसांना इंग्रजी भाषेत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी अन् मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला. नंतर दुपारी वाजता निवृत्तीचा मृतदेह सिव्हीलमध्ये आणला. दरम्यान, मुक्ताईनगरात गेल्या दोन वर्षांत विद्यार्थी इतरांच्या मिळून १२ आत्महत्या झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

शांतअन् मितभाषी : निवृत्तीहा शांत अन् मितभाषी असल्याचे त्याच्या मित्रांनी शेजाऱ्यांनी सांगितले. त्याच्या महाविद्यालयातील प्रवेशाला मंगळवारी एक महिना पूर्ण झाला होता. एसएमआयटी महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षात सी-बॅचमध्ये तो शिकत होता. दुपारी वाजता त्याचा तास असतो. त्याचे कुणाशी भांडणही झाले नसल्याचे विभागप्रमुख बी.एन.बाहेती यांनी सांगितले.

निवृत्ती हा अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला : निवृत्तीच्याकुटुंबवत्सलतेचे सर्व सार त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत सामावलेले आहे. त्याने एवढा आत्मघातकी निर्णय का घेतला असावा? त्याने अगदी २४ ऑगस्ट २०१५ मध्ये एसएमआयटी महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला होता. त्यामुळे परीक्षेत नापास होण्याचा प्रश्नच नाही. त्याने सिल्लोड येथील गोरक्ष आर्ट्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. बारावीत त्याला ८० टक्के गुण मिळाले होते. मग त्याला आयुष्याचा कंटाळा कशामुळे आला? याचा उलगडा झालेला नाही.

अपयशाला नवा अर्थ द्यायला शिकवा
मुलांना विकसित करताना संकटांना घाबरून जाता त्याचा धीरोदात्तपणे सामना करण्याची ऊर्जा पालकांनी मुलांमध्ये बालपणीच निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांना परिस्थितीशी लढण्याची शिकवण द्यायला हवी. आयुष्यात मनासारख्या गोष्टी होतातच, असे नाही. स्वत:चे परिक्षेत्र वाढवावे. आयुष्याचे मूल्यमापन करताना ते खूप मोठे असल्याची स्वत:ला जाणीव करून द्यावी. सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे बघावे. परीक्षेत अपयश आले किंवा एखाद्या मुलीने प्रेमास नकार दिल्यास मुलांचा एकाकी दृष्टिकोन तयार होतो. आयुष्याला अनेक कंगोरे आहेत. अपयश आले तरी त्याला नवीन अर्थ देण्याची गरज आहे. तसा दृष्टिकोन निर्माण करा. छंद, चळवळीत सहभाग घेण्यास प्रोत्साहित करा, त्यातून नैराश्य दूर होते. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

पुढे वाचा.. घरी फोन करून मागवली... पान