आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या अंत्ययात्रेस जाणाऱ्या सासूचा मृत्यू , लखनऊ-पुणे एक्स्प्रेसमध्ये घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पुणे येथे जावयाच्या अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या सासूचा रेल्वेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.१५ वाजता भुसावळ स्थानकावर घडली. याप्रकरणी लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामपती रामलाल सरोज (पासी) (वय ७०, रा.गंगागेज, कानपूर) लखनऊ-पुणे सुपरफास्ट या रेल्वेने ते कानपूर- पुणे असा प्रवास करत होत्या. त्यांच्या जावयाचे पुणे येथे निधन झाले होते. त्यामुळे अंत्ययात्रेसाठी त्या पुण्याला जात होत्या. मात्र, प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती गाडीतच खराब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मुख्य तिकीट निरीक्षक कार्यालयातून भुसावळ येथील यंत्रणेला संदेश देण्यात आला. त्यानुसार वाणिज्य विभागाचे उपस्टेशन व्यवस्थापक ए. जी. शेख, नरेंद्र मोघे यांनी प्लॅटफार्म एक वर रविवारी रात्री १२.१५ वाजता गाडीच्या जनरल डब्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हा मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.