आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्य ग्रुपच्या नीलेश गायकवाडने गाठले पीएसआयचे ‘लक्ष्य’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - अभ्यासाचे अचूक नियोजन, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरच आजमितीला पीएसआय म्हणून निवड झाली आहे. किंचीतशा यशाने हुरळून न जाता डीवायएसपी व्हायचं स्वप्न उराशी बाळगले आहे, ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे बोल आहेत पीएसआय पदासाठी निवड झालेल्या मोंढाळा (ता.भुसावळ) येथील नीलेश विठ्ठल गायकवाड या हरहुन्नरी युवकाचे.

एमपीएससीतील यशाचे रहस्य उलगडतांना तो म्हणाला की, यूपीएससीच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. दुर्दैवाने तेथे अपयश आले. मात्र, खचून न जाता दररोज आठ तास अभ्यास करण्याचे सातत्य टिकवून ठेवले. 21 एप्रिल 2012 रोजी एमपीएससीची पूर्व परीक्षा देऊन ती उत्तीर्ण झालो. 22 जुलै 2012 रोजी मुख्य परीक्षा दिली. त्यातही भरीव यश मिळाले. 5 एप्रिल 2013 ला मैदानी कसरत व मुलाखत पार पडली. त्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात पीएसआय म्हणून निवड झाली आहे. निवडीची बातमी जेव्हा कळली, तेव्हा अंतर्मन धन्य झाले. यशाचे र्शेय हे आई-वडील, मित्र, लक्ष्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनाच आहे. मिळालेले यश हे गुरुदक्षिणा म्हणून त्यांना सर्मपित केल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.