आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Kolhe Manage, MNS Sub Group Leader Allegation

ललित कोल्हे ‘मॅनेज’ झाले, मनसे उपगटनेत्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्थायी समिती महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे ‘मॅनेज’ झाल्याचा सनसनाटी आरोप पक्षाचे मनपातील उपगटनेते मिलिंद सपकाळे यांनी शनिवारी केला.निवडणुकीतील राजकारणाला कंटाळून सपकाळे यांनी उपगटनेत्याचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान,सपकाळे यांच्या आरोपांबाबत मौन बाळगून त्यांचा राजीनामा स्वीकृत केला असून लवकरच दुसरा उपगटनेता निवडला जाईल असे ललित कोल्हे यांनी सांगितले.आता उपगटनेतेपदी लीना पवार यांची नियुक्ती निश्चित समजली जात आहे.पक्षाच्या बैठकीत महिला-बालकल्याणसाठी मंगलाबाई चौधरी यांचे तर स्थायी सदस्यत्वासाठी ललित यांचे पिता विजय कोल्हे यांचे नाव निश्चित झाले होते.मात्र गटनेते ललित कोल्हे खान्देश विकास आघाडीकडून ‘मॅनेज ’झाले. त्यांनी ऐनवेळी स्थायी सदस्यत्वासाठी बंटी जोशी यांचे तर महिला बालकल्याणसाठी खुशबू बनसोडे यांचे नाव पुढे केले.
असा आरोप सपकाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. आपण उपमहापौरासह विविध पदांवर काम केले असल्याने दुसऱ्यांना संधी द्यावी हा प्रामाणिक हेतू होता. मात्र, आपल्यावर निष्क्रीयतेचा ठपका ठेवल्याचा दावाही सपकाळे यांनी केला. या वेळी प्रभाग समिती सभापती नितीन नन्नवरे, संजय चौधरी आदी उपस्थित होते.