आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ हायमास्ट दिव्यांचे स्विचबॉक्स फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील विविध भागात अामदार खासदारांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, श्रीरामनगर, बद्रीप्लाॅट भागात बुधवारी रात्री टवाळखोरांनी ११ हायमास्टच्या स्विचबॉक्सची तोडफोड केल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. परिणामी हायमास्ट बंद पडल्याने परिसरातील रहिवाशांची गैरसोय वाढली आहे.
शहरातील विविध भागात महत्त्वाचे चौक, वर्दळीच्या रस्त्यांवर खासदार, अामदार निधीतून हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. श्रीरामनगर, बद्रीप्लॉट भागातदेखील हायमास्ट बसवल्याने तेथील अडचण सुटली होती. दरम्यान, बुधवारी रात्री (दि.१९) काही अज्ञात टवाळखोरांनी या भागातील तब्बल ११ हायमास्टच्या स्विचबॉक्सची तोडफोड केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक नगरसेवक निर्मल कोठारी, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच याप्रकरणी पालिकेच्या माध्यमातून उपद्रवींवर गुन्हा दाखल करू, अशी माहिती उपनगराध्यक्ष लाेणारी नगरसेवक काेठारी यांनी दिली. दरम्यान, हायमास्ट बंद पडल्याने रहिवाशांची मात्र गैरसोय झाली आहे.

à स्विचबॉक्सचीतोडफोड केल्यामुळे नागरिकांची गैरसाेय झाली अाहे. मात्र, या भागात बसवलेल्या सीसीटीव्हीत टवाळखोरांच्या हालचाली कैद झाल्या असून पोलिसांना माहिती देऊ. निर्मलकाेठारी, नगरसेवक

Ãतोडफोड करणाऱ्यासंबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच पालिकेच्या वीज अभियंत्यांना पाठवून याप्रकरणाचा अहवाल मागवणार आहे. बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी

या भागात नासधूस
शहरातील हनुमाननगर, बद्री प्लाॅट, श्रीरामनगर, वांजाेळा राेड, मिरची ग्राउंड, मृत्युंजय मंडळ या भागातील ११ हायमास्टच्या स्विचबॉक्सची तोडफोड झाली. बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत हे हायमास्ट सुरू होते. ११ वाजेनंतर स्विचबॉक्सची तोडफोड झाल्याचे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...