आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जमीन खरेदी-विक्रीची माहिती एका क्लिकवर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाडेपट्टा, गहाणखतापासून ते प्लॉट, जमिनीच्या खरेदी-विक्रीसह विविध 70 प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित असलेला नोंदणी व मुद्रांक विभागही आता ऑनलाइन झाला आहे. जमीन, जागेशी संबंधित संपूर्ण राज्यातील व्यवहार, रेडीरेक्नर, भाव आदींबाबतची सर्व माहितwww.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. ‘आय सरिता’ Isarita, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या नवीन संकल्पनेने सारे व्यवहारविश्व आवाक्यात आणले आहे. या प्रकल्पामुळे फसवणुकीचे व्यवहार, जास्तीचे पैसे वसुली, वेळेचा अपव्यय, व्यवहारातील असुरक्षितता या गोष्टींना या प्रकल्पामुळे आळा बसणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत खरेदी-विक्री, करारनामे, प्रतिज्ञापत्रे, मृत्युपत्र, दान आदींसह आर्थिक व मालकी हक्कांचे व्यवहार केले जातात. त्यासाठी राज्यात अशी 412 कार्यालये कार्यान्वित आहेत. राज्यभरातील प्रत्येक गाव, तांडे, वाड्यांपासून ते महानगरापर्यंत शेती, बिनशेती, घरे, गावठाण, गायरान, प्लॉट, फ्लॅट, पक्के बांधकाम आदींचे भाव, ंिठकाण, मालमत्ता क्रमांक आदी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील 9 विभागांमधील 360 उपकार्यालये, 31 जिल्हा कार्यालये, विभागीय व इतर सर्व कार्यालये यामार्फत एकत्र जोडण्यात आली आल्याने कोणी कोठे व्यवहार केला हे सहज कळू शकत आहे.
एका क्लिकवर माहिती - जागेचे दर, मुद्रांक शुल्काच्या रकमेचा अंदाज, नोंदणी कार्यालयांची माहिती, ऑनलाइन व्यवहार नोंदणी, व्यवहारांसाठी लागणा-या वेळेची आगाऊ बुकिंग, जमिनीच्या आधीच्या मूळ व्यवहाराची व मूळ मालकाची माहिती, व्यवहार झाल्याची खात्री, ऑनलाइन रेडीरेक्नर, ऑनलाइन पेमेंट, व्यवहार नोंदणीबाबत माहिती, नवीन योजना, शासकीय निर्णय, व्यवहाराशी संबंधित नवीन बातम्या, विवाह नोंदणी, व्यवहार नोंदणी, अर्ज, सर्वाधिक क्लिष्ट वाटणारी नोंदणी प्रक्रिया संकेतस्थळावर सहज कळते.
आधी मोफत, नंतर सशुल्क - इन्स्पेक्टर जनरल (रजिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ स्टॅम्प) एस. चोकलिंगम यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात सध्या प्रायोगिक तत्त्वावर मोफत (ट्रायल बेस) करण्यात आली आहे. 2002 पासूनच्या नोंदणी व्यवहारांची माहिती या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. तसेच सूचना आणि सुधारणांनंतर या संकेतस्थळावरून माहितीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यात ऑनलाइन पेमेंटचा पर्यायदेखील समाविष्ट करण्यात आला आहे.
ई-सर्चची किमया - राज्यात इच्छित स्थळी व्यवहार करताना तेथील जागेच्या रेडीरेक्नरप्रमाणे मूल्यांकन, मिळकतीची माहिती, मूळ मालकी, व्यवहारासाठी लागणारे मुद्रांक शुल्क आदींबाबत माहिती ई-सर्च पर्यायात उपलब्ध आहे. व्यवहार करायचा असल्यास नोंदणीसाठी आगाऊ टोकन बुकिंग करून कार्यालयात जाण्यासाठी तारीख आणि टाइम स्लॉटदेखील बुकिंग करता येतो.