आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदित कलावंतांना सादरीकरणाची संधी; भूमी फाउंडेशनच्या चर्चासत्रात घेण्यात आला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या रविवारी शहरातील संगीत, नाट्य, नृत्य या कलाक्षेत्रातील कलावंतांनी एकाच छताखाली येऊन आपल्याला अवगत असलेली कला सादर करावी तसेच ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे; जेणेकरून कलावंतांचे एकत्रिकरण तर होईलच मात्र नवोदित कलावंतांना कला सादर करायची संधीही मिळेल, असे चर्चासत्रात कलावंतांनी ठरवले.
भूमी फाउंडेशनतर्फे रविवारी शहरातील विविध क्षेत्रातील कलावंतांसाठी रविवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी, तसेच नृत्य, संगीत क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पीयूष रावळ, विनोद ढगे, योगेश शुक्ल, प्रा.किरण अडकमोल, तेजस गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष संदीप तायडे, समन्वयक ऋषिकेश सोनवणे, सुभाष गोपाळ, गणेश पाटील, नृत्यातील हाफिज खान, ज्ञानेश्वर सोनवणे, अजय शिंदे, मनोज रंधे, संगीतातील अमोल ठाकूर, पंकज बारी उपस्थित होते. येणार्‍या 3 ऑगस्टला (रविवार) पहिला उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात राज गुंगे लिखित एकांकिकेचे वाचन होणार असून लिखाणातील बारकाव्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या वेळी साधारणत: 50 जणांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदवला. अमोल ठाकूर यांनी सूत्रसंचालन तर संस्थेचे सचिव वैभव मावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बारकाव्यांचे मार्गदर्शन
विनोद ढगे म्हणाले की, हा उपक्रम चांगला असून यात सातत्य राहायला हवे. जेणेकरून इच्छुक कलावंत आपल्याशी जुळले जातील. तर पीयूष रावळ यांनी प्रकाश योजनेचे बारकावे थोडक्यात सांगितले. हाफिज खान म्हणाले की, आपण नवीन विद्यार्थ्यांना, संघाला नृत्यात तयार केले तरच स्पर्धा टिकून राहील. शहरात एक, दोन संघच राहिले तर स्पर्धा कशी होणार. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयार करा, त्यांचे संघ तयार करून स्पर्धा खेळवा. तसेच प्रत्येक क्षेत्रात फ्रेम बांधून ठेवल्या आहेत, ते राहू देऊ नका. कलावंतांना त्यांची मोकळीक द्या; बंधनात अडकवून ठेवू नका. त्याच्या कल्पनेप्रमाणे रंगमंचावर वावरू द्या, असे मत अमरसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. या उपक्रमांतर्गत नाटकातील दिग्दर्शन, लेखन, आंगिक, सात्विक, आहार्य अभिनय, प्रकाश योजना, रंगभूषा, नेपथ्य, लोककला, पथनाट्य, नृत्यातील शास्त्रीय, वेस्टर्न, लोकनृत्य, संगीतातील प्रकार या बारक ाव्यांचे ज्येष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.