आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अामदारासाठी भूखंड हडपल्याची तक्रार! शेतकऱ्याची न्यायालयात धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमशी माेबाइलवर संभाषण केल्याच्या कथित अाराेपाचे खंडन करताना खडसेंसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे विधान परिषदेचे आमदार डाॅ.गुरुमुख जगवाणी अाणि ‘बेटी बचाअाे, बेटी पढाअाे’ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डाॅ.राजेंद्र फडके यांच्या स्नुषा स्नेहल फडके यांना सध्या ४० काेटी रुपये बाजारमूल्य असलेला २ हेक्टर २३ अार. भूखंड एमअायडीसीने बहाल केल्याची तक्रार मूळ जमीन मालकाने केली अाहे.

हे भूसंपादन एमअायडीसीच्या हाती नसल्याने महसूल विभागाच्या मदतीने नियम धाब्यावर बसवून अापल्या इच्छेिवरुद्ध ही जमीन संपादित केली, अशी तक्रार करत संबंधित मूळ जमीन मालक दीपक तंबाखूवाला यांनी याप्रकरणी काेर्टात दाद मागितली अाहे. दरम्यान, एमअायडीसीकडे असलेल्या माहितीनुसार या जागेवर भव्य हाॅटेल उभारले जाणार अाहे.
जळगाव-अाैरंगाबाद महामार्गावर रस्त्याला लागून मानराज माेटर्ससमाेर डाव्या बाजूला दीपक बळवंतलाल तंबाखूवाला यांची मेहरूण शिवारात २ हेक्टर २३ अार. शेतजमीन अाहे. १९८०मध्ये ही शेतजमीन एमअायडीसीने भूसंपादित करण्यासंदर्भात तंबाखूवाला यांना नाेटीस दिली हाेती. मात्र, या जमिनीचे मालक स्वत: उद्याेग सुरू करणार असल्याने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सन १९८३मध्ये, तर न्यायालयाने १९९८मध्ये एमअायडीसीला जमिनीचा ताबा घेऊ नये, असे अादेश दिले अाहेत. नंतर पुन्हा २००९मध्ये एमअायडीसीने त्यांना माेबदला मागण्याचा हक्क देऊन जमिनीची मागणी केली. दरम्यानच्या काळात अामदार डाॅ.जगवानी अाणि भाजपचे ज्येष्ठ नेते डाॅ.राजेंद्र फडके यांच्या स्नुषा स्नेहल यांनी एमअायडीसीकडे हाॅटेलसाठी जमिनीची मागणी केली. तंबाखूवाला यांची माेक्याची जागा हेरून महसूल विभागाच्या मदतीने १६ डिसेंबर २०१३ राेजी या जमिनीचा ताबा घेण्याचा निवाडा जाहीर करण्यात अाला.

१ जानेवारी २०१४पासून भूसंपादन कायदा लागू हाेणार असल्याने, एमअायडीसीने हा कायदा हाती घेऊन पुढची माेहीम फत्ते केली. त्यासाठी तडजाेडीस नकार देणाऱ्या एमअायडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदलीही करण्यात अाल्याचा अाराेप तंबाखूवालाने केला अाहे. या जमिनीचे बाजारमूल्य ४० काेटी रुपयांपेक्षा अधिक असताना मूल्यांकन केवळ १ लाख १९ हजार ८६३ रुपये एवढे काढण्यात अालेे. तसेच त्यात १९८०पासून व्याज देऊन एकूण ४ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत. स्वखुशीने जमीन देण्यास तयार नसलेल्या या शेतकऱ्याला प्रकरण न्यायालयात असल्याने सांगून अद्याप एक रुपयादेखील माेबदला दिलेला नाही.

१९८०च्या मूल्यांकनानुसार दर : एमअायडीसीमध्ये असलेल्या या जमिनीच्या
भूसंपादनासंदर्भात विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी १६ डिसेंबर २०१३ राेजी अंतिम निवाडा देऊन जमिनीचा ताबा घेत असल्याचे जाहीर केले. त्यात या जमिनीला १९८०मधील रेडी रेकनरच्या दराप्रमाणे ४ लाख ५० हजार रुपये एवढा माेबदला मंजूर करण्यात अाला. प्रत्यक्षात मात्र यापैकी एक रुपयादेखील मिळाला नसल्याचे जमीनमालक दीपक तंबाखूवाला यांनी सांगितले.

पुढे वाचा...
> काँग्रेस अाघाडी सरकारच्या काळात झटपट मंजुरी; यंदा जानेवारीत ताबा
> ३२ वर्षांनंतर जुन्या दराने केला निवाडा
> न कळवताच जमिनीचा ताबा घेतला!
> मुलाचा भूखंड घाेटाळा उघड; पाेलिस सहअायुक्तांची बदली
बातम्या आणखी आहेत...