आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादातून महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पथराड येथील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासर-माहेरच्या लाेकांमध्ये सिव्हिलमध्येच वाद निर्माण झाला. त्यावेळी संतप्त नातेवाइक नागरिकांचा ‌झालेला जमाव. - Divya Marathi
पथराड येथील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासर-माहेरच्या लाेकांमध्ये सिव्हिलमध्येच वाद निर्माण झाला. त्यावेळी संतप्त नातेवाइक नागरिकांचा ‌झालेला जमाव.
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून धरणगाव तालुक्यातील पथराड येथील महिलेवर उपचार सुरू हाेते. मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, तिच्या मुलाच्या नावावर जमीन करा, तरच मृतदेह ताब्यात घेणार, असा पवित्रा माहेरच्या लाेकांनी घेतला. त्यामुळे सिव्हिलमध्ये सासर अाणि माहेरच्या लाेकांमध्ये एक तास वाद सुरू हाेता. पाेलिसांनी हा वाद मिटवला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात वृषाली प्रवीण निकुंभ (वय ३०, रा.पथराड, ता.धरणगाव) या महिलेवर मूत्रपिंड अाणि यकृत निकामी झाल्याने उपचार सुरू हाेते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला. परंतु, तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या मंडळीने नकार दिला. तसेच मृत महिलेचा भाऊ प्रवीण विठ्ठल पाटील (रा.पाळधी, ता.जामनेर) याने प्रथम जमीन मुलांच्या नावावर करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने सामान्य रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. या वेळी जिल्हापेठ पाेलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. तरीही नातेवाइकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शेवटी प्रवीण पाटीलकडून याबाबत लेखी घेऊन मृतदेह तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात अाला.