आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम्! वादग्रस्त शासकीय भूखंडच गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाशाबाबानगरातीलबिल्डरांच्या घशात गेलेला शासकीय भूखंड शाेधण्यासाठी प्रशासनाचा कस लागत अाहे. शासकीय भूखंड हरवला असल्यामुळे त्याच्या माेजमापासह शाेधण्याची जबाबदारी भूमी अभिलेख विभागावर टाकण्यात अाली अाहे. यासंदर्भात तहसीलदारांकडून भूमी अभिलेख विभागाला पत्र देण्यात अाले अाहे.
पिंप्राळा परिसरातील अाशाबाबानगरात असलेल्या गट नंबर ५७/१/३ हा शासकीय मालकीचा ४० अार क्षेत्रफळ असलेला भूखंड हरवला अाहे. तिन्ही बाजूने झालेल्या अतिक्रमणामध्ये हा भूखंड बिल्डरांनी घशात घातल्याचे उघड झाले असले, तरी भूखंड काेठे अाहे? हे अजूनही कळू शकलेले नाही. वस्ती असलेल्या भागात सर्व्हे क्रमांक माेजणी करणे अावश्यक असल्याने तहसीलदारांनी उपअधीक्षकजिल्‍हा भूमी अभिलेख विभागाला पत्र दिले अाहे. या विभागाकडून अाशाबाबानगरातील इतर सर्व्हे क्रमांकाचीही माेजणी हाेणार असून त्यानंतर अनेक गमती-जमती पुढे येण्याची शक्यता अाहे. शासकीय भूखंडासाेबत या भागातील महापालिकेची खुली जागाही गायब झाली असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे अाहे. दरम्यान, माेजणीनंतर सगळे गाैडबंगाल समाेर येणार असल्याने सध्या महसूल यंत्रणेने वेट अॅण्ड वाॅचचे धाेरण ठेवले अाहे.

नागरिकांमध्ये भीती
अापणराहत असलेल्या भूखंडाचा मूळ ७/१२ शाेधण्यासाठी अनेकांनी पिंप्राळ्यातील तलाठी कार्यालय गाठले अाहे. काहींनी अापल्याकडे असलेली कागदपत्रे, खरेदीखताची पडताळणी करून घेण्यास सुरुवात केली अाहे. परिसरातील अाेपन स्पेस, गटांचे मूळ क्षेत्रफळ याबाबत माहिती मिळवली जात अाहे. या भागात असलेल्या हाउसिंग सोसायट्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. बिल्डरांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात अाल्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली अाहे.