आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेठ्या बांधकामांच्या मंजुरीत सहा महिन्यात निम्मी घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेतील सुस्त नाेकरशाही अाणि बाजारपेठेतील मंदी याचा बांधकाम व्यवसायावर माेठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत अाहे. शहरातील अपार्टमेंट, राे-हाऊसेस तसेच घरांच्या वेगवेगळ्या याेजनांची संख्या गेल्या सहा महिन्यांत कमालीची घटल्याची माहिती नगररचना विभागातून मिळाली. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत केवळ १७ ले-अाऊटला परवानगी घेण्यात अाली अाहे. या तुलनेत शहरात वैयक्तिक बांधकामांसाठी नागरिकांचा अाेढा कायम असल्याचे दिसून येत अाहे.
गेल्या दाेन वर्षांपासून जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे बाजारपेठेतील चैतन्य नाहीसे झाले अाहे. ग्रामीण भागातून हाेणारी गुंतवणूक ठप्प झाली अाहे. व्यावसायिकांनाही पुरेसा व्यवसाय नसल्याने व्यवहार वाढवणे जिकरीचे जात अाहे. अशा तुलनेत काही अंशी पगारदारांच्या माध्यमातून बाजारात उलाढाल सुरू असल्याचे जाणकारांचे मत अाहे.
बाजारपेठेतील अन्य व्यवसायांच्या तुलनेत बांधकाम क्षेत्रातही याचे पडसाद उमटताना दिसत अाहेत. यासंदर्भात जळगाव शहराच्या विकासाला विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घरांच्या बांधकामातही कमालीची घट झाल्याचा अंदाज पालिकेच्या अाकडेवारीवरून पाहायला मिळत अाहे. शहराचा वाढता विस्तार पाहता गेल्या काही वर्षांत जळगावातही अपार्टमेंट संस्कृती वाढीस अाली अाहे. परंतु अाजमितीस मंदीचा परिणाम म्हणून शहरातील बऱ्याच अपार्टमेंटमधील घरांचे व्यवहार थांबल्याचे निदर्शनास येत अाहे. नगररचना विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांत माेठ्या बांधकामांच्या परवानगीसाठी अर्ज येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले अाहे. वास्तविक बांधकाम साहित्याच्या दरात बऱ्याच प्रमाणात घट झालेली असताना ग्राहकांकडून हाेणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम झाल्याने घरांच्या मागणीतही घट झाल्याचे जाणकारांचे मत अाहे.

नवेवर्ष लाभदायक
नाेव्हेंबर डिसेंबर महिन्यात महापालिकेच्या नगररचना विभागातील सहायक संचालकांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांचे काम थांबवण्याचे अादेश देण्यात अाले हाेते. त्यामुळे सहायक संचालक रजेवर गेल्याने नगररचना विभागात बांधकामासह अन्य परवानगीसाठी माेठ्या प्रमाणात फायली येऊन पडल्या हाेत्या. सहायक संचालक कामावर रूजू हाेऊनही त्यांना स्वाक्षरीचे अधिकार नसल्याने काम ठप्प पडले हाेते. अखेर त्यांचे अधिकार वापरण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवीन वर्षात म्हणजे १९ दिवसांत तब्बल १९४ बांधकाम परवानगी देण्यात अाल्या अाहेत. परंतु यात माेठ्या बांधकामांची संख्या अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात अाले.

बाजारातील मंदीचा परिणाम परवानगीमध्येही
^बाजारातील मंदीचा परिणाम बांधकामासाठीच्या परवानगीमध्येही जाणवत अाहे. गेल्या सहा महिन्यांत अपार्टमेंट, राे-हाऊसेस यासारख्या माेठ्या कामांच्या मंजुरीचे प्रमाण अत्यंत कमी झाले अाहे. लहान खासगी बांधकामांसाठी नागरिक प्रकरणे दाखल करत अाहेत. मात्र, त्यातही माेठा उत्साह पाहायला मिळत नाही. चंद्रकांत निकम, सहायकसंचालक, नगररचना विभाग
१२ ले-अाऊट परवानगी