Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | lashkar e taiba terrorists killed 2 garud commandos of indian air force in Jammu

काश्मिरात नंदुरबारचे वायुदल कमांडो मिलिंद खैरनार शहीद; 27 वर्षांत प्रथमच वायुदलाचे 2 जवान शहीद

प्रतिनिधी | Update - Oct 12, 2017, 05:51 AM IST

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे हाजिन भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत इंडियन एअरफोर्समधील गरुड फोर्सचे 2 कमांडो श

 • lashkar e taiba terrorists killed 2 garud commandos of indian air force in Jammu
  शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार
  नंदुरबार- काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत वायुदलाचे २ गरुड कमांडो शहीद झाले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील सार्जेंट मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) यांच्यासह नीलेशकुमार यांना वीरमरण आले. दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मिरात २७ वर्षांत अतिरेक्यांविरुद्ध कारवाईत प्रथमच वायुदलाचे जवान शहीद झाले आहेत. याआधी २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यात एक गरुड कमांडो शहीद झाला होता.

  हाजिन भागात ३ ते ५ अतिरेकी लपल्याचे कळल्यानंतर पोलिस, विशेष पथक व लष्कराने पहाटे ५ला मोहीम राबवली. वायुदलाचे गरुड कमांडोही या अभियानात अनुभव व प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर गरुड कमांडो घडतात. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज या दलाला हवाई हल्ला, शत्रूंचा माग काढणे, हवाई आक्रमण, स्पेशल कॉम्बॅट आणि बचाव मोहिमांसाठी तयार केले जाते.
  बोराळे गावावर शोककळा
  नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील रहिवासी व वायुसेनेतील जवान मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) हे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या मृत्यूने बोराळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे वडील किशोर खैरनार हे वीज वितरण कंपनीत ऑपरेटर होते. निवृत्त झाल्यानंतर ते नाशिक येथे स्थायिक झाले.
  मुलगा शहीद झाल्याचे वृत्त कळताच ते नंदुरबारकडे निघाले आहेत. मिलिंदचे वडील व अाई सुनंदा हे दाेन महिने त्याच्या घरी चंदिगडला राहिले. मात्र मिलिंद सीमेवर तैनात असल्यामुळे त्याची भेट न हाेताच ते मंगळवारी नाशिकला परतले हाेते अाणि बुधवारी त्यांना ही दु:खद घटना कळाली.

  गुरुवारी सायंकाळपर्यंत मिलिंद यांचे पार्थिव मूळ गावी बोराळे येथे आणण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार तापी नदीकाठी असलेल्या जागेत करण्यात येणार आहेत. प्रशासकीय अधिकारी गावात ठाण मांडून आहेत. बोराळे (ता.नंदुरबार) येथे जन्मलेल्या मिलिंद यांचे शिक्षण दहिवेल, निजामपूर, साक्री तसेच धुळे येथे झाले. १६ डिसेंबर २००२ रोजी ते वायुसेनेत भरती झाले. दिल्ली, पश्चिम बंगालमधील कलाईकोंडा, गुजरातमधील नलीय या भागात पोस्टिंग झाल्यानंतर ते सध्या चंदिगड येथे गरुड कमांडो पदावर सेवारत होते. बुधवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. या वेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात मिलिंद खैरनार शहीद झाले. घटनेचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली. मिलिंदला कृष्णा नावाचा दोन वर्षांचा मुलगा आणि वेदिका नावाची चार वर्षांची मुलगी आहे. पत्नीचे नाव हर्षदा आहे. पत्नी व मुले हे चंदिगडला हेडक्वार्टरला राहतात.

  धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात काही काळ मिलिंद यांनी वास्तव्य केले होते. त्याच्या शहीद झाल्याच्या वृत्तामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. ​तहसीलदार संदीप भोसले यांना संदेश मिळाल्यानंतर या जवानाच्या नातलगांचा व रहिवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनीही साक्रीत या जवानाच्या पत्त्यावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार यांचे फॅमिली फोटो
 • lashkar e taiba terrorists killed 2 garud commandos of indian air force in Jammu
  पत्नी आणि मुलांसोबत मिलिंद किशोर खैरनार
 • lashkar e taiba terrorists killed 2 garud commandos of indian air force in Jammu
  आई-वडिलांसोबत मिलिंद किशोर खैरनार
 • lashkar e taiba terrorists killed 2 garud commandos of indian air force in Jammu
  शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार

Trending