आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेसिक सर्जरीमुळे मुले म्हणताहेत, चष्मा नको रे बाबा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आजकाल चष्मा न लावणे एक फॅ शन झालेली आहे. चष्म्यामुळे काही ठिकाणी नोकरी मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे मुले चष्मा वापरण्यास तयार नाहीत. लग्नासाठीदेखील चष्मा डोकेदुखी ठरत असल्याने अनेक मुले-मुली लेसिक सर्जरीला प्रथम प्राधान्य देताना दिसून
येत असल्याने, अलीकडच्या काळात लेसिक सर्जरीने तरुणाईमध्ये क्रेझ निर्माण झाली असून शस्त्रक्रिया करणा-यांची संख्या वाढलीआहे.
फॅशन म्हणून करतात मुले लेसिक सर्जरी - ठरावीक म्हणजे वय वर्षे 18 ते 20 नंतरच लेसिक सर्जरी केली जाते; मात्र आज फॅशन म्हणून या सर्जरीकडे पाहण्याचा मुलांचा कल दिसून येत आहे. शाळेत जाण्याच्या वयातही मुले सरळ लेसिक सर्जरीची माहिती मिळवण्याच्या मागे धावत असल्याचे दिसून येते. लेसिक सर्जरी केल्याने आपल्या चष्म्याचा नंबर वाढणे थांबेल, असे मुलांना वाटते. त्यामुळे ते नेत्ररोगतज्ज्ञाकडे चौकशीसाठी जाताना दिसून येतात.
पालकांनीच द्यावे लक्ष - प्रत्येक महिन्यात लेसिक सर्जरी करणा-यांचे प्रमाण वाढत आहे. 18 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या काही गुंतागुंतीच्या केसमध्येच फक्त ही सर्जरी केली जाते. ज्याची पुतळी पातळ व तिचा आकार बदलत असेल आणि चष्म्याचा नंबर जास्त असेल तर अशा वेळेस सर्जरी करणे टाळले जाते. त्यामुळे वेळीच पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या मुलांना डोळ्यांचा त्रास होत आहे, अशा पालकांनी आपल्या मुलांना नेत्रतज्ज्ञांकडे घेऊन जाणे फायदेशीर आहे.
लग्न जमविण्यासाठी नको असतो चष्मा... - नोकरी तसेच लग्नासाठी मुलांप्रमाणेच पालकही लेसिक सर्जरीला महत्त्व देतात. त्यासाठी ज्या मुलांना चष्मा आहे त्यांचे पालक लग्नाअगोदरच नेत्ररोगतज्ञाकडे आवर्जून चौकशीसाठी घेऊन जाताना दिसून येतात. त्यातील काही सुजाण पालकांचे मत असे आहे की, मुलांची वाढ ही 15 ते 19 या वयात झपाट्याने होत असते. त्यामुळे वेळीच जर ही सर्जरी केली गेली तर चष्म्याचा नंबरही कमी होतो.
लेसिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय? - डोळ्यांच्या पुतळीला लेसरद्वारे सामान्य करणे म्हणजे लेसिक शस्त्रक्रिया होय. नजरेवर ज्या वेळी परिणाम होतो त्या वेळी कमी दिसायला लागते. त्यामुळे पुतळीचा आकार बदलत जातो. लेसर शस्त्रक्रियेने दृष्टीत अशी सुधारणा केली जाते की, जेणेकरून रेटिना प्रतिबिंबित होणारी छबी अधिक चांगली दिसेल. तसेच नेत्रदोष हा कमी होण्यास मदत होते.