आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा "मंगळ'वार , महनि्याच्या ब्रेकनंतर २४ तासांत पाच चोऱ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव आॅक्टाेबर महनि्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबर महनि्याच्या पहिल्या आठवड्यात चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला होता. मात्र, एक महनि्याच्या ब्रेकनंतर पुन्हा घरफोड्या करणाऱ्यांनी डाेके वर काढले आहे. मंगळवारी भरदिवसा तर सोमवारी मध्यरात्री चार ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला.

रेल्वेस्थानकापासून २० मीटर अंतरावर असलेल्या माजी नगरसेवक पांडुरंग काळे यांच्या मालकीच्या शिल्पा हॉटेलमध्ये सोमवारी रात्री चोरट्यांनी बाथरूमची खिडकी तोडून प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दीड क्वॉर्टर हॉटेलमध्येच रिचवली. क्वॉर्टर दारूसोबत घेऊन गल्ल्यातील १५० रुपये लंपास केले. त्यानंतर हॉटेलला लागून असलेल्या भरत सावला यांच्या सूर्या रेल्वे जनरल तिकीट विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी प्रवेश केला. त्या ठिकाणी गल्ल्यात असलेले १६ हजार रुपये चोरट्यांनी लांबवले. कायमच गर्दी असणाऱ्या रेल्वेस्थानकाजवळ चोरट्यांनी हॉटेल आणि दुकान फोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गणेश कॉलनीमधील गुरूदत्त काॅलनीत राहणारे रेल्वे पोलिसातील सहायक उपनिरीक्षक सुरेश पाटील यांच्या बंद घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा घरफोडी केली. त्यात लग्नासाठी माहेरी आलेल्या त्यांच्या मुलीचे साडेसात तोळे सोन्याचे दागनिे १३ हजार रोख लंपास केले. सकाळी १०.३० वाजता पाटील यांच्या पत्नी आणि मुलगी वरणगाव येथे लग्नासाठी गेल्या होत्या तर पाटील अमळनेरला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दुपारी कुलूप तोडून चोरी केली. पाटील मंगळवारी दुपारी वाजता घरी आल्यानंतर त्यांना चोरीची घटना लक्षात आली. याप्रकरणी जिल्‍हापेठ पोिलसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान श्वान पथकाने महामार्गापर्यत रास्ता दाखविला.

वाघनगरातील गुरुदत्तनगरात विजय निकुंभ यांच्या घरात रवींद्र भगीरथ शुक्ल हे वैद्यकीय प्रतिनिधी भाड्याने राहतात. त्यांच्या नातेवाइकांचे लग्न असल्याने ते दोन दिवसांपासून धुळ्याला गेलेले होते. त्यामुळे, घराला कुलूप होते. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री शुक्ल यांच्या घरातील कपाट फोडून पाच हजारांचे सोन्याचे दागनिे आणि पाच हजार रोख असा १० हजारांचा एेवज लांबविला.

त्यांच्या बाजूच्या गल्लीत प्रदीप जाधव यांच्या घरात बनवारीलाल मुरलीधर सैनी हे राजस्थानी टाइल्स बसवणारे िमस्तरी भाड्याने राहतात. त्यांच्या घरी कार्यक्रम असल्याने ते १५ दिवसांपासून राजस्थानला गेलेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, एक चांदीची साखळी आणि १५० रुपये रोख चोरट्यांनी लांबवले. त्यानंतर चोरट्यांनी जिजाऊनगरातील रत्नाकर बारी यांच्याकिराणा मालाचे दुकान आणि िपठाची चक्की मंगळवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास कुलूप तोडले. त्या ठिकाणी काहीहीमिळाल्याने त्यांनी किराणा दुकानाचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली. बारी यांना आवाज आला त्यामुळे, त्यांनी लाइट सुरू करून बाहेर आले. तोपर्यंत चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.