आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवरणपत्र भरण्यासाठी करदात्यांची दमछाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणा-या प्रत्येकाला आर्थिक वर्ष 2011-12 आणि 2012-13 साठी 31 जुलै 2013 पर्यंत आयकर रिटर्न भरणे बंधनकारक आहे. यामुळे विवरणपत्र भरण्यासाठी जुन्या बीजे मार्केटमधील आयकर विभागाच्या कार्यालयात सध्या गर्दी पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे याच वर्षापासून हा नवा नियम लागू झाल्याने अनेक जण याबाबत अनभिज्ञ आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या वेतनभोगी व्यक्तीचे ढोबळ वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असेल आणि त्यात इतर मार्गाने मिळणाºया दहा हजार रुपयांचा समावेश आहे, त्यांना आर्थिक वर्ष 2011-12 आणि 2012-13 साठी आयकर विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या करसवलतीनुसार सर्वसामान्यांना दोन लाख, ज्येष्ठ नागरिकांना 2.5 लाख, तर अतिज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असून त्याचा फायदा घेण्यासाठी चार्टर्ड अकौटंट्सचा सल्ला हे विवरणपत्र भरताना घेणे फायद्याचे आहे.

टीडीएसची खात्री करावी
विवरणपत्र भरण्यापूर्वी टीडीएस कापला गेला आहे याचे विवरण प्रत्येकाने पाहिले पाहिजे. ऑनलाईन फॉर्म 16 मध्ये ही माहिती पाहता येते. तसेच गुंतवणुकीबाबत वस्तुस्थिती अकाउंटंट आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या लक्षात आणून दिली तर कुठल्याच अडचणी येणार नाहीत.
परीक्षित भदादे, अध्यक्ष, सीए असोसिएशन

...तर दंडाचा भुर्दंड
30 जुलैपर्यंत आर्थिक वर्ष 2011-12 आणि 2012-13 साठीचे विवरणपत्र सादर करायचे असून ही तारीख चुकली तर मात्र जुलै ते 31 मार्च 2014 पर्यंत विवरणपत्र भरता येईल. मात्र करपात्र रकमेवर व्याज भरावे लागेल. 31 मार्च 2014 ही तारीखही चुकल्यास 31 मार्च 2014 नंतर विवरणपत्र भरता येईल. मात्र करपात्र रकमेवर दंड आकारला जाणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

30 सप्टेंबरपर्यंत यांना मुदत
ज्या करदात्यांना लेखापरीक्षण बंधनकारक आहे, त्यांच्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत आयकर विभागाकडे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असून या प्रकारच्या करदात्यांमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, ट्रस्ट यांसारख्या खासगी आस्थापनांचा समावेश आहे.