आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आणखी एक प्रेमविवाह !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - देवपूर पोलिसांच्या मध्यस्थीने शनिवारी पुन्हा एका प्रेमीयुगुलाचे लग्न लावण्यात आले. शहरातील एकवीरादेवी मंदिरात रात्री आठ वाजता वैदिक पद्धतीने हा विवाह पार पडला. गेल्या पाच दिवसांत हा दुसरा विवाह सोहळा आहे.

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील गवंडीकाम करणारा नरेश पंडित लोंढे हा काही दिवसांपूर्वी शहरातील साठ खोली परिसरात मामाचा मुलगा दिलीप भगवान कसबे याच्या लग्नासाठी आला होता. लग्न सोहळय़ासाठी काही दिवस तो मामाकडेच होता. या कालावधीत त्याचे मामाची मुलगी मधू भगवान कसबे हिच्याशी प्रेमसंबंध जुळले; मात्र दोघांच्या संबंधाबाबत त्यांच्या पालकांना कल्पना नव्हती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नरेशचे वडील पंडित लोंढे यांना पक्षाघाताचा झटका आला. त्या वेळी नरेशच्या कुटुंबाकडून मधूला मागणी घालण्यात आली; मात्र मधू पदवीपर्यंत शिकलेली, तर नरेश अशिक्षित असल्याने मधूच्या पालकांनी या लग्नास नकार दिला; मात्र त्याच वेळी मधूने हिंमत करून आपण नरेशवर प्रेम करत असल्याचे सांगितले. तथापि, या लग्नास कोणत्याही परिस्थिती परवानगी देणार नसल्याचे तिच्या पालकांनी स्पष्ट केले. यादरम्यान मधू आणि नरेशचे संबंध असल्याचे पालकांना समजल्यामुळे त्यांनी शनिवारी पोलिस ठाणे गाठले. ठाणे अंमलदार र्शीमती नाथजोगी यांनी मधूच्या पालकांचे म्हणणे ऐकून घेत नरेशशी संपर्क साधून त्याला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या नातलगांना बोलवून र्शीमती नाथजोगी आणि पोलिस कान्स्टेबल रावसाहेब पाटील यांनी समजावून लग्नासाठी राजी केले. अशा प्रकारे दोघा परिवारात समझोता झाल्याने पोलिसांच्या सहकार्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास एकवीरादेवी मंदिरात वैदिक पद्धतीने विवाह झाला.