आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्ययात्रेला तिन्ही मुलींनी दिला खांदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- आई-वडिलांचे अंत्यसंस्कार मुलानेच करावे, असा प्रघात समाजात आहे. मात्र, भुसावळ येथील पंधरा बंगला भागातील सुरेंद्रकुमार गुप्ता (वय 56) यांच्या तिरडीला त्यांच्या तिन्ही मुलींनी खांदा देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. ऐवढेच नव्हे, तर स्मशानभूमीत सर्व अंत्यविधी करून वंशाचा दिवा ‘दीपक’ नव्हे, ‘ज्योती’ही चालेल, असा संदेशही या घटनेच्या माध्यमातून दिला आहे.

सुरेंद्रकुमार गुप्ता हे मथुरेजवळील छाता येथील मूळ रहिवासी आहेत. ते रेल्वेच्या विद्युत इंजीन कारखान्यात वरिष्ठ अभियंता होते. नोकरीच्या निमित्ताने ते भुसावळात वास्तव्यास होते. काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या संगीता अजयकुमार वासले, सुप्रिया सुमितकुमार वासले, डॉ.दीप्ती नीलेश सावळे या तिन्ही मुलींनी अंत्ययात्रेला खांदा दिला. रुढी, परंपरांना फाटा देऊन गुप्ता यांची दिल्ली येथे स्थायिक असलेली मोठी मुलगी संगीता हीने सर्व अंत्यविधी स्वत: करण्याचे धाडसी पाऊल उचलले. तापीनदी काठावरच्या स्मशानभूमीत तिने वडिलांच्या चितेला अग्निडाग दिला.