आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी राॅकेटचा मारा करणाऱ्या लाॅन्चरची भुसावळात निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ अायुध निर्माणीत एकाच वेळी सहा राॅकेटचा मारा करणाऱ्या पिनाक पाॅड लाॅन्चरची निर्मिती केली जात अाहे. यंदा ५० रॉकेट लाॅन्चर तयार करण्याचे उद्दिष्ट आयुध निर्माणीला मिळाले होते. मात्र, प्रत्यक्षात ३१ रॉकेट लॉन्चरची निर्मिती करण्यात आली अाहे, अशी माहिती भुसावळ अायुध निर्माणीचे महाप्रबंधक अार.एस. ठाकूर यांनी दिली.

शुक्रवारी भुसावळ अायुध निर्माणीचा वर्धापन दिन अाहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी आयुध निर्माणीत पत्रकार परिषद घेण्यात आली. महाप्रबंधक ठाकूर म्हणाले की, भुसावळ आयुध निर्माणीत युद्धासाठी लागणारे उपकरण बाॅक्स, कॅरिअर, सिलिंडर, ड्रम, बॅरल यांचे उत्पादन केले जाते. मात्र, आयुध निर्माणीची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता, काेलकाता अायुध निर्माणी विभागाने ‘मल्टी बॅरल राॅकेट लाॅन्चर’ प्रणालीची उपप्रणाली पिनाका पाॅडचे उत्पादन करण्याची जबाबदारी दिली.

छायाचित्रांचे प्रदर्शन : भुसावळअायुध निर्माणीच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी अायुध निर्माणी उत्पादनांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अायाेजित करण्यात आले आहे. पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. तसेच अग्निशमनची प्रात्यक्षिके दाखवली जाणार अाहेत. रात्री वाजता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ‘इश्काची लावणी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला मुख्य महाप्रबंधक अार.एस.ठाकूर, अति. महाप्रबंधक एस.बी.पाटील, संयुक्त महाप्रबंधक अार.एन.एस. चाैहान, सुधीर मलिक, उपमहाव्यवस्थापक टी.बी. देशमुख, कर्नल अनुप अग्रवाल, पी.एक्का, ए.के. देशमुख उपस्थित हाेते.

१८१ जणांची भरती
वाढीवकामासाठी भुसावळ अायुध निर्माणीत १८१ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. वाढीव कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाला गती दिली जाईल. कामाचा वेग आणखी वाढवण्यावर भर राहील.

वर्षांत ४५० लाॅन्चर
अागामी२०१६-१७ या वर्षात एकूण ७३ पिनाका पॉड (लाॅन्चर) तयार केले जाणार आहेत. २०१७-२०१८ या वर्षात २०० पिनाका पाॅड तयार केले जाणार अाहेत, तर २०१८-१९ मध्ये एकूण ४५० पिनाका पाॅडचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे.