आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूरलाही विधी विद्यापीठ स्थापन करणार - टोपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आज सर्वच विभागात विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्या दृष्टीने देशभरात 17 राष्ट्रीय विधी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, औरंगाबादसह नागपूरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील विधी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.


स्त्री शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी अध्यक्षस्थानी होते. आजच्या शिक्षणाचा घसरता दर्जा आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाबद्दल चिंता व्यक्त करतानाच टोपे यांनी शैक्षणिक पत वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज विशद केली.


ते म्हणाले की, तंत्रशिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर शिष्यवृत्ती देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. विधी क्षेत्रासाठी राष्ट्रीय पातळीवर तीन विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी मुंबई, औरंगाबाद येथील विद्यापीठाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर नागपूर येथील विद्यापीठासही येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. विधी शाखेतही अनेक प्रकारच्या संशोधनाला वाव आहे. त्यादृष्टीनेही विचार करून सायबर लॉ सारख्या विषयाचे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे.