आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयोवृद्ध लक्ष्मण पाटील यांचा नाल्यात पडून मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भिकमचंद जैननगरातील बीएचआर पतसंस्थेजवळील नाल्यात चक्कर येऊन पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली.लक्ष्मण पुंडलिक पाटील (वय 69, रा.बाभूळगाव, ता.धरणगाव) असे या वृद्धाचे नाव आहे.

डोळ्यांनी थोडे अधू असलेले लक्ष्मण पाटील हे मंगळवारी त्या भागात फिरत होते. यावेळी अचानक चक्कर आल्याने तोल जाऊन ते जवळच असलेल्या नाल्यात पडले. ते भोईटनगरातील दिनेश पाटील या त्यांच्या मुलाकडे राहत होते. घटनेनंतर प्रथम त्यांना डॉ.सुभाष चौधरी यांच्याकडे व नंतर सहयोग क्रिटिकल केअरमध्ये दाखल करण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते बाभूळगावचे माजी सरपंच होते. याबाबत कुठल्याही पोलिस ठाण्यात नोंद केली नसल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले.