आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात ५४ हजारांची एलबीटी चोरी; लाख ७० हजारांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्थानिक संस्था कर चुकवून बनवेगिरी करणाऱ्यांना महापालिका प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. ५४ हजार रुपयांची एलबीटी वाचवण्याच्या प्रयत्नात गुपचूप १८ लाखांचे काजूचे डबे उतरवणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पाचपट अर्थात लाख ७० हजार रुपये दंड आकारला. शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगरात ही कारवाई करण्यात आली.

राज्यभरात एलबीटीवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. भाजपने सरकार आल्यास महिनाभरात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु दोन महिने उलटूनही एलबीटी रद्द होत नसल्याने व्यापाऱ्यांनीही कराचा भरणा करणे बंद केले आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात प्रचंड घट होत आहे. त्याचा परिणाम शहरातील सोयीसुविधांवर होताना दिसत आहे.
महासभेतही यावर जोरदार चर्चा झाली होती. यात मार्गस्थ वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी करण्यात आला. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधीक्षक किरण भोळे, महेंद्र पाटील, शेखर महाजन, रवी सोनार, प्रभाकर शिंदे यांच्या पथकाने दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगरात डी. आर. ट्रान्सपोर्टचा एम. एच. ४० एके २७१७ हा ट्रक रिकामा करताना पकडला.

असोसिएशनचा इशारा
^व्यापाऱ्यांनी नियमानुसार एलबीटीचा भरणा पालिकेत केला पाहिजे. एलबीटी रद्द होणार असली तरी जोपर्यंत लागू आहे, तेवढा भरणा करावाच लागेल. कोणी कर चुकवण्याचा प्रयत्न केल्यास व्यापारी असोसिएशन त्यांच्या पाठिशी राहणार नाही. -प्रवीण पगारिया, अध्यक्ष,दाणाबाजार असोसिएशन

जप्त केलेला ट्रक आणला पालिकेत
महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात येताच उपायुक्त प्रदीप जगताप यांनी ट्रक ताब्यात घेऊन महापालिकेच्या आवारात आणला. मालाची मोजणी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर चार ते पाच जणांचा माल आहे. बिलांवरील नाव अत्यंत संशय निर्माण करणारे आहेत.
निरीक्षकाने बिल मागताच त..त..फ..फ..
एलबीटी विभागाचे वॉर्ड निरीक्षक शेखर महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ट्रक रिकामा करताना तपासणी केली. त्यात १० किलो वजनाचा एक डबा, असे ३५० काजूचे डबे असल्याचे लक्षात आले. बिलांची मागणी केली असता संबंधितांची धांदल उडाली. या आयशर ट्रकमध्ये सुमारे १८ लाखांचा माल आढळून आला. हा माल नागपूर येथून आला आहे.
आयुक्तांकडे धावत आले व्यापारी प्रतिनिधी
काजू या मालावर टक्के एलबीटीची आकारणी केली जाते. त्यामुळे १८ लाखांच्या मालावर ५४ हजार एलबीटी होते. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांचा माल पकडताच काही व्यापारी प्रतिनिधी थेट आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे धावत आले. त्यांनी यापुढे असे होणार नाही. आम्ही व्यापाऱ्यांना समजावतो. केवळ एलबीटीची आकारणी करा, दंडाची आकारणी करू नये, अशी विनंती केली. परंतु आयुक्त कापडणीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून थेट पट दंड आकारावा, असे आदेश दिले. ५४ हजारांची एलबीटी वाचवण्याच्या प्रयत्नात लाख ७० हजार रुपयांचा दंड सोसावा लागणार आहे.

मार्गस्थ वाहने तपासणीचे आदेश
आयुक्त कापडणीस यांनी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून यापुढे दररोज मार्गस्थ वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले. काय कारवाई केली, याची माहिती दररोज सकाळी १० वाजता आपल्या दालनात येऊन सादर करावी, अशी सक्त सूचना केली आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान करून कोणी फसवणूक करत असेल तर कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.