आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आर्थिक’ दुष्काळ, त्यात तेरावा महिना, ‘एलबीटी’त मनपाला साडेचार कोटींचा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव - महापालिकेच्या स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणीदरम्यान २०१२-१३ या आर्थिक वर्षात कराच्या भरणात अनेक उणविा आढळून आल्या आहेत. वेगवेगळ्या कर आकारणीत महापालिकेचे तब्बल साडेचार काेटींचे नुकसान झाले असून लेखापरीक्षकांनी या रकमा वसूल कराव्यात, असा शेरा दिला आहे. यावर सध्या महापालिका प्रशासनाकडून आत्मचिंतन सुरू असुन नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून जळगाव शहरात स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीची अंमलबजावणी सुरू आहे. आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी बंद होण्याची शक्यता असताना २०१२-१३ या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारांची शासनाने लेखापरीक्षण केले आहे. यात अनेक मुद्दे आक्षेपार्ह आढळून आले आहेत. एलबीटीच्या रकमा मुदतीत भरणा करणे, मुदतीनंतर देय होणारी व्याजाची आकारणी करून रकमा वसूल करण्याची अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे महापालिकेचे २५ लाख ६७ हजार ३५७ रुपयांचे नुकसान झाले आहे. एलबीटी कर रकमा वसुलीकरिता साहित्याच्या प्रकारानुसार दर राजपत्रात नमूद करण्यात आलेले असताना ठरलेल्या दराने एलबीटी वसूल केल्यामुळे कोटी ७० लाख हजार ४६७ रुपयांचे नुकसान झाले आहे. एलबीटी नोंदणीकृत व्यावसायिकांनी मुदतीत महापालिकेकडे विवरणपत्र सादर केलेले नाहीत. त्यामुळे मुदतीत सादर केलेल्या वविरणपत्राबाबत शास्तीची आकारणी होऊन रकमा वसूल करण्यात आलेल्या नाहीत. यामुळेदेखील पालिकेचे लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे.

२०१२-१३ या आर्थिक वर्षात एलबीटी रकमांचे निर्धारण करण्यात आलेले नाही. पूर्वी झालेल्या कर निर्धारणातील वसूल ठरलेल्या कर रकमांची वसुली करण्यात आलेली नाही.

वसुलीकडे दुर्लक्ष
नोंदणीकृतव्यावसायिकांकडून त्यांच्या आर्थिक उलाढालनुसार कर रकमा प्राप्त करणे आवश्यक आहे. काही प्रकरणात कर रकमांचा भरणा निरंक असून त्यासाठी नियमानुसार किमान हजार रुपये प्रमाणे कर वसूल होणे क्रमप्राप्त होते. परंतु या प्रकरणात वसुलीची कार्यवाही झाल्याने उत्पन्नापासून वंचित राहण्याची अनियमितता झालेली आहे. यामुळे कोटी ४३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रकरणांत ठपका
पाचप्रकरणांमध्ये तब्बल कोटी ५९ लाख ८० हजार ७४५ रुपये वसूलपात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावर सध्या मनपात आत्मचिंतन सुरू आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने सध्या विचार सुरू आहे.