आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीचे व्याज, दंड माफीसाठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एलबीटी संदर्भात दंड व्याज माफीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांची महापालिकेत प्रचंड झुंबड उडाली आहे. गुरुवारी तब्बल ६२ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला. योजनेच्या लाभासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने व्यापाऱ्यांची आणखी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या महिन्यात शासनाने एलबीटीधारकांसाठी अॅम्नेस्टी योजना राबवली होती. ३१ जुलै ही या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख आहे. या योजनेत एलबीटी भरलेल्या व्यापाऱ्यांना मूळ रक्कम भरल्यास दंड व्याज माफी मिळणार आहे. जुलै महिन्यात पालिकेने पावणेसहा कोटी रुपये एलबीटी वसूल केली. एका व्यापाऱ्याने पाच वर्षांचा एकूण १६ लाख रुपये भरणा केला. त्याला व्याज दंड मिळून लाख रुपये माफ करण्यात अाले.