आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करून व्हॅटमध्ये अधिभार लावण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्यातील व्यापारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभर व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, दाणाबाजार सुरू राहणार आहे. दाणाबाजार असोसिएशनतर्फे बंदला फक्त पाठिंबा दिला असून, बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक संस्था कराला व्यापार्यांचा विरोध होत असून मुंबई, ठाणे, पुणे, पिंप्री चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, अमरावती, नागपूर येथील व्यापार्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात बंदचा इशारा देण्यात आला आहे.
बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापार्यांची दुकाने सुरू राहू नये म्हणून महामंडळाने दुकानांना सील लावण्याची तयारी ठेवली आहे. दुकान सुरू ठेवल्यास पाच हजार रुपये दंड करण्याचेही प्रस्तावित आहे. दाणाबाजार असोसिएशनने बंदमध्ये सहभागी होऊन दुकानेही बंद ठेवावीत म्हणून त्यांचे मन वळवण्याचे प्रय} महामंडळाच्या पदाधिकार्यांकडून सुरू आहेत.
बंदने काही साध्य होत नाही
व्यापार बंद ठेवल्याने शासनाला काहीही फरक पडत नाही. उलट ग्राहकांची गैरसोय, नोकरवर्गाचे किंवा व्यापारावर अवलंबून असलेल्यांची रोजीरोटी बंद होते. शहरातील अर्थचक्रावर याचा परिणाम होतो. जिल्हा व्यापारी महामंडळाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. आम्ही मात्र बंद ठेवणार नाही, ज्यांना बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना विरोध करणार नाही. प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन
प्रशासनास देणार निवेदन
बंदचे नियोजन करण्यासाठी व्यापारी महामंडळातर्फे फुले मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व व्यापारी एकत्र जमून दिवसभराची दिशा ठरवतील. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांना महामंडळाचे अध्यक्ष मिर्शीलाल चोपडा, उपाध्यक्ष युसूफ मकरा, मानद कार्यवाहक शिवनारायण झवर, सह सचिव ललित बरडिया, सुरेश चिरमाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी निवेदन देणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.