आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीसंदर्भात आज ठरणार दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी कायम ठेवावी की अन्य पर्यायांचा विचार करावा, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या भावना जाणून घेण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.
स्थानिक संस्था कराच्या वसुलीच्या मुद्यावरून व्यापार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापौरांनी एलबीटी कायम ठेवण्याची आग्रही भूमिका मांडल्याने मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत व्यापार्‍यांची मते जाणून घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महापौर राखी सोनवणे यांनी 12 जून रोजी सकाळी 11 वाजता पालिकेतील दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात व्यापार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. जळगावातही एलबीटी कायम ठेवावी की एलबीटीची वसुली पालिकेकडून न करता विक्रीकर विभागाकडून करण्यात यावी, यावर चर्चा होणार आहे. यासाठी शहरातील 35 व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेत सहभागी होण्याचे कळवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता व्यापार्‍यांकडून कालबाह्य झालेली जकातही नको आणि एलबीटी देखील नको असल्याचे मत व्यक्त होत आहे.
त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत काय चर्चा होते, यावर एलबीटीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. व्यापारी प्रतिनिधी पुरुषोत्तम टावरी, प्रवीण पगारिया, दिलीप गांधी यांनी बुधवारी दुपारी आयुक्त कापडणीस यांची भेट घेऊन चर्चाही केली. देशातील इतर कोण्याही राज्यात दुहेरी करप्रणाली नाही. महाराष्ट्रातही उद्योग व्यापाराचा विकास करायचा झाल्यास दुहेरी कर प्रणाली नकोच अशी भूमिका व्यापारी, उद्योजक प्रतिनिधींनी मांडली. मोठय़ा लढय़ानंतर निघालेली जकात पुन्हा नकोच या मुद्यावर व्यापारी प्रतिनिधी ठाम आहेत.